GT vs DC, 1st Innings Highlights : दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capital) गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघाला 131 धावांचं आव्हान दिलं आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पाहायला मिळत आहे. दिल्लीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली संघाने 20 षटकात आठ गडी गमावून 130 धावा केल्या. दिल्लीचे फलंदाज गुजरातच्या गोलंदाजांच्या जाळ्यात पुरते अडकले. गुजरातचा फलंदाज मोहम्मद शमीनं दिल्लीच्या चार खेळाडूंनी तंबूत पाठवलं.
दिल्लीचं गुजरातला 131 धावांचं आव्हान
दिल्ली संघाने सात षटकांत पाच गडी गमावून 32 धावा केल्या आहेत. दिल्लीला पाचव्या षटकात पाचवा धक्का बसला. शमीने प्रियम गर्गला यष्टिरक्षक साहाकरवी झेलबाद केले. प्रियमला 14 चेंडूत 10 धावा करता आल्या. शमीला चौथी विकेट मिळाली. यापूर्वी त्याने फिलिप सॉल्ट, रिले रुसो आणि मनीष पांडे यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.
यंदाच्या मोसमात पॉवरप्लेमध्ये पाच विकेट गमावणारा दिल्ली पहिला संघ
पॉवरप्ले म्हणजे दिल्लीची धावसंख्या पहिल्या सहा षटकांत 28 धावांत पाच विकेट्स अशी होती. पॉवरप्लेमध्ये संघाने पाच विकेट गमावण्याची यंदाच्या मोसमातील ही पहिलीच वेळ आहे. शमीने चार षटकांचा कोटा पूर्ण केला आहे. त्याने चार षटकांत 11 धावा देऊन चार बळी घेतले.
पहिल्या 6 षटकात दिल्लीचा अर्धा संघ तंबूत परतला. दिल्ली कॅपिटल्स संघाचा डाव सांभाळण्याची जबाबदारी अमन हकीम खान आणि अक्षर पटेल यांनी घेतली. दोघांनी मिळून 10 षटकांत धावसंख्या 58 धावांपर्यंत नेली. यानंतर दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 54 चेंडूत 50 धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलच्या रूपाने 73 धावांवर दिल्लीला सहावा धक्का बसला. अक्षर 30 चेंडूत 27 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
यानंतर अमन हकीम खानला रिपल पटेलची साथ मिळाली. दोघांनी गुजरातच्या गोलंदाजांवर थोडा दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला. यावेळी दिल्ली संघाने 17 व्या षटकात 100 धावांचा टप्पा पार केला. यानंतर अमन डावाच्या 19 व्या षटकात 44 चेंडूत 51 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
अमन आणि रिपल यांच्यात सातव्या विकेटसाठी 27 चेंडूत 53 धावांची भागीदारी झाली. या सामन्यात रिपल पटेलने 23 धावांची खेळी केली, तर दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 8 गडी गमावून 130 धावा केल्या. गुजरातकडून मोहम्मद शमीने 4 तर मोहित शर्माला 2 आणि राशिद खानला 1 बळी मिळाला.