GT vs CSK, IPL 2023 Live : गुजरातचा चेन्नईवर पाच विकेटने विजय

GT vs CSK Live Score : गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे.

नामदेव कुंभार Last Updated: 31 Mar 2023 11:38 PM
गुजरातचा चेन्नईवर पाच विकेटने विजय

गुजरातने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला. 

गुजरातला मोठा धक्का, विजय शंकर बाद

मोक्याच्या क्षणी गुजरातची विकेट पडली आहे. विजय शंकर बाद झाला. 

गुजरातला मोठा धक्का, शुभमन गिल बाद

गुजरातला मोठा धक्का, शुभमन गिल बाद झाला आहे. मोक्याच्या क्षणी गिल बाद झाला आहे. गुजरात चार बाद 138 धावा


 

गुजरातला मोठा धक्का, हार्दिक पांड्या बाद

रविंद्र जाडेजाने हार्दिक पांड्याला बाद करत गुजरातला मोठा धक्का दिला.  हार्दिक पांड्या आठ धावा काढून बाद झाला.

गुजरातला दुसरा धक्का, साई सुदर्शन बाद

साई सुदर्शनच्या रुपाने गुजरातला दुसरा धक्का बसला. हंगाकरेकर याने साई सुदर्शनला बाद केले.साई सुदर्शन 22 धावांवर बाद झाला.

शुभमन गिल-साई सुदर्शनची तुफानी फलंदाजी

शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केलेय. गिल 32 तर साई सुदर्शन 19 धावांवर खेळत आहे. गुजरात एक बाद 82 धावा

साई सुदर्शन इम्पॉक्ट प्लेअर म्हणून मैदानात

विल्यमसनच्या जागी साई सुदर्शन मैदानात उतरला आहे.

गुजरातला पहिला धक्का, साहा बाद

विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या साहाला हंगार्केकर याने बाद केला. गुजरातला पहिला धक्का बसलाय. साहा 25 धावा काढून बाद झाला

गुजरातची अश्वासक सुरुवात, साहा-गिल यांची दमदार फलंदाजी

शुभमन गिल आणि वृद्धीमान साहा यांनी दमदार सलामी दिली आहे. साहा 25 तर गिल 9 धावांवर खेळत आहे. 

चेन्नईची 178 धावांपर्यंत मजल

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या विस्फोटक अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने सात विकेटच्या मोबद्लायत 178 धावा केल्या.

शिवम दुबे बाद, सीएसकेला सातवा धक्का

शिवम दुबेच्या रुपाने चेन्नईला सातवा धक्का बसला. शामीच्या गोलंदाजीवर दुबे 19 धावा काढून बाद झाला.

चेन्नईला आणखी एक धक्का, जाडेजा बाद

मोठा फटका मारण्याच्या नादात जाडेजा बाद झाला. धोनी मैदानावर आलाय. 

चेन्नईला मोठा धक्का, गायकवाड 92 धावांवर बाद

हाणामारीच्या षटकात ऋतुराज गायकवाड बाद झाला आहे. 50 चेंडूत 92 धावा खेळून बाद झालाय.

चेन्नईला चौथा धक्का, अंबाती रायडू बाद

जोशवा लिटल याने अंबाती रायडूला क्लीन बोल्ड केलेय. रायडू 12 धावा काढून बाद झाला

ऋतुराजचे 23 चेंडूत अर्धशतक

ऋतुराज गायकवाड याने अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक झळकावले. यामध्ये पाच षटकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे.  





गुजरातला तीन धक्के, बेन स्टेक्स स्वस्तात बाद

बेन स्टोक्स याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. स्टोक्स अवघ्या सात धावांवर तंबूत परतला. राशिद खान याने स्टोक्स अन् मोईन अलीला बाद केला. ऋतुराज गायकवाड तुफानी फटकेबाजी करत आहे. गायकवाड 27 चेंडूत 57 धावांवर खेळत आहे. 


 

ऋुतुराजची फटकेबाजी, झळकावले अर्धशतक

ऋतुराज गायकवाड याने अवघ्या 25 चेंडूत अर्धशतकी खेळी केली.

चेन्नई सुपर किंग्जची दुसरी विकेट पडली

 


चेन्नई सुपर किंग्जची दुसरी विकेट पडली. मोईन अली 17 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. त्याला राशिद खानने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 5.5 षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या 50/2 आहे.

मोईन-ऋतुराजची तुफानी फलंदाजी

 


चेन्नई सुपर किंग्जने 5 षटकांनंतर 1 गडी गमावून 46 धावा केल्या आहेत. मोईन अली 12 चेंडूत 19 धावा करून खेळत आहे. ऋतुराजने 13 चेंडूत 24 धावा केल्या आहेत. 

चेन्नईला पहिला धक्का, डेवेन कॉनवे बाद

मोहम्मद शामीने कॉनवेला बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला.

चेन्नईची खराब सुरुवात

पहिल्या दोन षटकात चेन्नईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दोन षटकात फक्त दोन धावा केल्यात.

गुजरातची प्लेईंग 11 - 

शुभमन गिल, वृद्धीमान साहा (विकेटकिपर), केन विल्यमसन, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), राहुल तेवातिया, राशिद खान, मोहम्मद शामी, जोश लिटिल, अल्जारी जोसेफ, यश दयाल

गुजरातने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

नाणेफेकीचा कौल गुजरातने जिंकला असून चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेय. 

अरिजीतचा धमाकेदार फरफॉर्म, हार्दिकसह चाहत्यांनी दिली दाद

IPL 2023 Opening Ceremony Live : आयपीएलच्या ओपनिंग सरेमनीला सुरुवात झाली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याने स्टेजवर परफॉर्म केलेय. अरिजीतने गिटार हातात घेत गाणे गायले.. अरिजीतच्या आवाजावर नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये उपस्थित असणारे चाहते थिरकले... अरिजीत सिंह याने 'प्यार होता कई बार है'  हे गाणे गायले... या गाण्याला उपस्थित असणाऱ्या क्रीडा चाहत्यांनी दाद दिली. त्याशिवाय हार्दिक पांड्या आणि गुजरातमधील इतर खेळाडूही गाणे एन्जॉय करताना दिसले. आयपीएलने अधिकृत ट्विटर खात्यावर अरिजीत सिंह गातानाचा व्हिडीओ पोस्ट केलाय. 

अरजितचा धमाकेदार परफॉर्म

थोड्याच वेळात सुरु होणार आयपीएल

गुजरात आणि चेन्नई यांच्यातील सामन्याने आयपीएलचा शुभारंभ होणार आहे.

आयपीएल चषकासोबत दिसला मिस्टर आयपीएल

रश्मिका अन् तमन्ना ओपनिंग सरेमनीमध्ये करणार डान्स

आजपासून आयपीएलचा रनसंग्राम सुरु होणार

हेड टू हेड

गुजरात संघाचे आयपीएलमधील दुसरे वर्ष आहे. पहिल्याच वर्षी गुजरात संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. 2022 मध्ये पदार्पणातच गुजरात संघाने आयपीएलवर नाव कोरले. गेल्यावर्षी गुजरात आणि चेन्नई यांच्यात दोन सामने रंगले होते. दोन्ही सामन्यात गुजरात संघाने बाजी मारली होती. पहिल्या सामन्यात तीन तर दुसऱ्या सामन्यात सात विकेटने गुजरातने चेन्नईचा पराभव केला होता.  

GT vs CSK : पिच रिपोर्ट  

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ मैदानात उतरणार आहे तर हार्दिक पांड्या गुजरात संघाचे नेतृत्व करत आहे. दोन्ही संघातील सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघाकडे अनेक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे.अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गोलंदाज आणि फलंदाजामध्ये तुल्यबळ सामना पाहायला मिळतो. खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात.. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो.. या मैदानावर 180 पर्यंत धावांच्या लक्षाचा पाठलाग होऊ शकतो.  नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते... पण सुरुवातीच्या षटकात येथे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या गोलंदाजाला यश मिळतेच. 

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील रिकॉर्ड

नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत 19 आयपीएल सामने झाले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 8 वेळा विजय मिळवला आहे. तर धावांचा पाठलाग करताना 11 वेळा संघाला यश आले आहे. पहिल्या डावातील सर्वोच्च धावसंख्या 203 इतकी आहे तर दुसऱ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या 191 इतकी आहे.  पहिल्या डावात सरासरी 160 धावा होतात तर दुसऱ्या डावात सरासरी 150 धावा होतात.  

आयपीएल 2023 साठी चेन्नई सुपर किंग्सचे संपूर्ण  स्क्वाड -

एमएस धोनी (कर्णधार), डेवोन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापति, मोइन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, सिमर देशपांडे, दीपक चाहर, प्रशांत सोळंकी 

चेन्नईची कमजोरी काय?

मुकेश चौधरी दुखापतीमुळे खेळण्याची शक्यता कमी आहे. दीपक चाहर खूप दिवसानंतर संघात पुनरागमन करत आहे, त्याला लयीत येण्यास वेळ लागेल.. तसेच काही खेळाडू सुरुवाच्या सामन्यासाठी उपलब्ध नसतील.. संघाची योग्य ती मोट बांधण्याचे धोनीपुढे आव्हान असेल.. त्याशिवाय जाडेजाचा अपवाद वगळता भारतीय फिरकीपटू नाही.

चेन्नई संघाची ताकद काय?

अष्टपैलू खेळाडूंचा भरणा हीच या संघाची सर्वात मोठी ताकद होय.. त्याशिवाय कर्णधार धोनीचे नेतृत्वही जमेची बाजू आहे. चेपॉकवरील संथ खेळपट्टीवर धोनी गोलंदाजांचा अचूक वापर करतो.. रविंद्र जाडेजा, मोईन अली, बेन स्टोक यांच्याशिवाय शिवम दुबे आणि दीपक चाहर यांच्या अष्टपैलू खेळाडू संघासाठी फायदेशीर ठरेल. त्याशिवाय  डेवोन कोनवे आणि ऋतुराज गायकवाड यांची सलामी संघाची जमेची बाजू आहे. 

धोनी पुन्हा एकदा चेन्नईचे नेतृत्व करणार

गेल्यावर्षी चेन्नईला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. यंदा बेन स्टोक्स संघासोबत जोडला गेल्यामुळे चेन्नईची ताकद आणखी वाढली आहे. त्याशिवाय संघात एकापेक्षा एक सरस अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. कधीकाळी डॅडीज आर्मी म्हणून ओळखला जाणारा चेन्नई यंदा अष्टपैलू खेळाडूमुळे चर्चेत आहे. स्टोक्स फलंदाजी आणि गोलंदाजीत कमाल करु शकतो. त्याशिवाय रविंद्र जडेजा आणि मोईन अली यासारखे दर्जेदार अष्टपैलू खेळाडू संघाची ताकद आणखी वाढवतात. मुकेश चौधरीच्या दुखापतीने चेन्नईचे टेन्शन वाढले आहे. गेल्यावर्षी मुकेश चौधरीने अचूक टप्प्यावर मारा केला होता. ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉनवे यंदाही सलामीला दिसतील.. चेन्नईचा सर्वात प्लस पाँईट म्हणजे धोनी होय.. धोनी पुन्हा एकदा चेन्नईचे नेतृत्व करणार आहे.... 

आयपीएल 2023 साठी गुजरात टायटन्सचे संपूर्ण स्क्वाड

हार्दिक पंड्या(कर्णधार), राशिद खान, राहुल तेवतिया, शुभमन गिल, मोहम्मद शमी, शिवम मावी, जोशुआ लिटिल, यश दयाल, डेविड मिलर, आर साई किशोर, अभिनव सदरंगानी, अल्जारी जोसेफ, मॅथ्यू वेड, केन विलियमसन, रिद्धिमान साहा, जयंत यादव , विजय शंकर, केएस भरत, ओडियन स्मिथ, मोहित शर्मा, नूर अहमद, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, दर्शन नालकंडे, साई सुदर्शन  

गुजरात संघासमोर प्रश्न काय ?

गुजरातचा संघ कागदावर मजबूत दिसतोय. पण संघाकडे सलामीची समस्या आहे. शुभमन गिलसोबत सलामीला कोण येणार? हा प्रश्न आहे. विल्यमसन, साहा हे पर्याय संघाकडे आहेत. त्याशिवाय मॅथ्‍यू वेडही सलमीला येऊ शकतो. सलामीला कोण येणार.. हा गुजरातपुढील सर्वात मोठा प्रश्न आहे. त्याशिवाय शामीच्या जोडीला मावीला संधी मिळणार की इतर कुणाला? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

गुजरातसाठी जमेची बाजू काय?

 यंदाचा गुजरात संघ गेल्यावर्षीपेक्षा मजबूत दिसत आहे. हार्दिक पांड्याकडे नेतृत्वाचा अनुभव आहे. त्याशिवाय तो आता अन स्विंग गोलंदाजीही करत आहे. त्याशिवाय शुभमन गिल सध्या लयीत आहे. राशिद खान याने नुकतेच दमदार कामगिरी केली आहे. पीसीएलमध्ये राशिद खान याने 11 सामन्यात 20 विकेट घेतल्या होत्या. त्याशिवाय डाव्या आणि उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंचे योग्य ते संतुलन आहे. हार्दिक आणि अन्य अष्टपैलू खेळाडूमध्ये संघ संतुलीत दिसत आहे. अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा आहे.

GT vs CSK, IPL 2023 Live : यंदा गुजरातचा संघ अधिक मजबूत

 GT vs CSK, IPL 2023 Live : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने यंदाच्या लिलावत केन विल्यमसन, ओडिन स्मिथ, जोशुआ लिटिल आणि केएस भरत यांना खरेदी केलेय.  शुभमन गिल, राशिद खान, डेविड मिलर आणि राहुल तेवतिया यासारखे स्टार खेळाडू आधीच संघात आहेत. डेविड मिलर पहिल्या सामन्यासाठी अनुपलब्ध असेल.. गोलंदाजीत मोहम्मद शमी, राशिद खान, अल्जारी जोसेफ आणि यश दयाल आहेत.. या तिन्ही गोलंदाजांनी गेल्यावर्षी दमदार कामगिरी केली आहेत. त्याशिवाय जयंत यादव आणि साई किशोर यांचाही पर्याय आहे. तर  युवा फिरकीपटू नूर अहमद सप्राइज पॅकेज ठरु शकतो. गेल्यावर्षीपेक्षा यंदा गुजरातचा संघ अधिक मजबूत दिसत आहे. 

IPL चा पहिला सामना गमावला अन् चषक उंचावला 

IPL 2015 च्या सलामीच्या सामन्यात मुंबईला कोलकाता संघाकडून सात विकेटने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर फायनलमध्ये मुंबईने दमदार कामगिरी करत सीएसकेचा पराभव करत जेतेपद पटकावले होते. तसेच 2020 मध्ये मुंबईला सीएसकेकडून सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर फायनलमध्ये दिल्लीचा पराभव करत मुंबईने जेतेपद मिळवले होते. 

IPL चा सलामीचा सामना जिंकून जेतेपद जिंकणारे संघ - 

 GT vs CSK, IPL 2023 Live :


सलामीचा सामना जिंकला अन् जेतेपदही जिंकले असे IPL 2011, 2014 आणि 2018 मध्ये घडलेय. IPL 2011 मध्ये CSK ने KKR चा दोन धावांनी पराभव करत पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर फायनलमध्ये आरसीबीचा पराभव करत चषकाला गवसणी घातली होती.  IPL 2014 मध्ये पहिल्या सामन्यात KKR ने मुंबईचा पराभव केला होता. त्यानंतर फायनलमध्ये पंजाबचा पराभव करत चषकावर नाव कोरले होते. अशाच पद्धतीने IPL 2018 च्या सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा पराभव केला होता, त्यानंतर फायनलमध्ये हैदराबादला मात देत चषक उंचावला होता

IPL चा पहिला सामना गमावला अन् चषक उंचावला, दोन वेळा झाला योगायोग
GT vs CSK, IPL 2023 Live : ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूड तडका 

GT vs CSK, IPL 2023 Live :  यंदाच्या आयपीएलला उद्घाटन सोहळा म्हणजे ओपनिंग सेरेनमीसह (Opening Ceremony) सुरुवात होणार आहे. सुमारे पाच वर्षानंतर आयपीएलला ओपनिंग सेरेमनीसह सुरुवात होणार आहे. त्यामुळे यंदा धूमधडाक्यात आयपीएलला सुरुवात होणार आहे. ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूड तडका पाहायला मिळणार आहे. 

GT vs CSK, IPL 2023 Live : हेड टू हेड.. कोणाचे पारडे जड

GT vs CSK, IPL 2023 Live :  गुजरात संघाचे आयपीएलमधील दुसरे वर्ष आहे. पहिल्याच वर्षी गुजरात संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. 2022 मध्ये पदार्पणातच गुजरात संघाने आयपीएलवर नाव कोरले. गेल्यावर्षी गुजरात आणि चेन्नई यांच्यात दोन सामने रंगले होते. दोन्ही सामन्यात गुजरात संघाने बाजी मारली होती. पहिल्या सामन्यात तीन तर दुसऱ्या सामन्यात सात विकेटने गुजरातने चेन्नईचा पराभव केला होता.  

GT vs CSK, IPL 2023 Live : कधी अन् कुठे होणार सामना ?

GT vs CSK, IPL 2023 Live : आजपासून IPL 2023 ला सुरुवात होणार आहे. सुमारे पाच वर्षानंतर आयपीएलला उद्घाटन सोहळ्यासह सुरुवात होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या ठिकाणी पहिला सामना रंगेल. सामना सुरू होण्याच्या दीड तास आधी उद्घाटन सोहळा पार पडेल आहे. आयपीएलचा उद्घाटन सोहळा 6 वाजता सुरु होईल आणि सुमारे 45 मिनिटे चालेल. यानंतर 7 वाजता नाणेफेक होईल आणि 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. आयपीएल 2023 मधील पहिला सामना चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सचा आणि गतविजेत्या गुजरात टायटन्समध्ये रंगणार आहे.


GT vs CSK, IPL 2023 Live : आज कसेय वातावरण, सामन्यात पावसाचा व्यत्यय होणार का?

GT vs CSK, IPL 2023 Live : दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटणार आहे. ताज्या अपडेटनुसार, आज अहमदाबादचे हवामान स्वच्छ राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, येथे पावसाची शक्यता नाही. म्हणजेच क्रिकेट चाहत्यांना कोणताही अडथळ्याविना आजच्या सामन्याचा आनंद घेता येणार आहे.


हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज अहमदाबादमध्ये कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत तर किमान तापमान 22 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान म्हणजे संध्याकाळी तापमान 29 अंशांच्या आसपास असू शकतं. चेन्नई आणि गुजरात संघातील सामन्यादरम्यान, 13 ते 18 किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याची अपेक्षा असून 50 ते 55 टक्के आर्द्रता देखील असण्याची शक्यता आहे.

GT vs CSK, IPL 2023 Live : अहमदाबादमध्ये गुरुवारी पाऊस पडला

 GT vs CSK, IPL 2023 Live : अहमदाबादमध्ये गुरुवारी येथे पाऊस पडला. अहमदाबादमधील वातावरणामुळे यंदाच्या मोसमातील पहिल्याच सामन्यावर पावसाचं सावट दिसून येत आहे. अहमदाबादमध्ये गुरुवारी पडलेल्या पावसामुळे चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स या संघांच्या सराव सत्रामध्येही व्यत्यय आला होता. 

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 1, GT vs CSK : गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे. शुक्रवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.  भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा आहे. कागदोपत्री दोन्ही संघ तुल्यबळ दिसत आहेत. विजयाने सुरुवात करण्याच्या इराद्याने हार्दिक आणि धोनीचे संघ मैदानात उतरतील. पाहूयात दोन्ही संघाबद्दल.... 


गुजरात टायटन्स -  
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने यंदाच्या लिलावत केन विल्यमसन, ओडिन स्मिथ, जोशुआ लिटिल आणि केएस भरत यांना खरेदी केलेय.  शुभमन गिल, राशिद खान, डेविड मिलर आणि राहुल तेवतिया यासारखे स्टार खेळाडू आधीच संघात आहेत. डेविड मिलर पहिल्या सामन्यासाठी अनुपलब्ध असेल.. गोलंदाजीत मोहम्मद शमी, राशिद खान, अल्जारी जोसेफ आणि यश दयाल आहेत.. या तिन्ही गोलंदाजांनी गेल्यावर्षी दमदार कामगिरी केली आहेत. त्याशिवाय जयंत यादव आणि साई किशोर यांचाही पर्याय आहे. तर  युवा फिरकीपटू नूर अहमद सप्राइज पॅकेज ठरु शकतो. गेल्यावर्षीपेक्षा यंदा गुजरातचा संघ अधिक मजबूत दिसत आहे. 


आयपीएल 2023 साठी गुजरात टायटन्सचे संपूर्ण स्क्वाड


हार्दिक पंड्या(कर्णधार), राशिद खान, राहुल तेवतिया, शुभमन गिल, मोहम्मद शमी, शिवम मावी, जोशुआ लिटिल, यश दयाल, डेविड मिलर, आर साई किशोर, अभिनव सदरंगानी, अल्जारी जोसेफ, मॅथ्यू वेड, केन विलियमसन, रिद्धिमान साहा, जयंत यादव , विजय शंकर, केएस भरत, ओडियन स्मिथ, मोहित शर्मा, नूर अहमद, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, दर्शन नालकंडे, साई सुदर्शन  


चेन्नई सुपर किंग्स -


गेल्यावर्षी चेन्नईला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. यंदा बेन स्टोक्स संघासोबत जोडला गेल्यामुळे चेन्नईची ताकद आणखी वाढली आहे. त्याशिवाय संघात एकापेक्षा एक सरस अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. कधीकाळी डॅडीज आर्मी म्हणून ओळखला जाणारा चेन्नई यंदा अष्टपैलू खेळाडूमुळे चर्चेत आहे. स्टोक्स फलंदाजी आणि गोलंदाजीत कमाल करु शकतो. त्याशिवाय रविंद्र जडेजा आणि मोईन अली यासारखे दर्जेदार अष्टपैलू खेळाडू संघाची ताकद आणखी वाढवतात. मुकेश चौधरीच्या दुखापतीने चेन्नईचे टेन्शन वाढले आहे. गेल्यावर्षी मुकेश चौधरीने अचूक टप्प्यावर मारा केला होता. ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉनवे यंदाही सलामीला दिसतील.. चेन्नईचा सर्वात प्लस पाँईट म्हणजे धोनी होय.. धोनी पुन्हा एकदा चेन्नईचे नेतृत्व करणार आहे.


GT vs CSK : पिच रिपोर्ट  


धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ मैदानात उतरणार आहे तर हार्दिक पांड्या गुजरात संघाचे नेतृत्व करत आहे. दोन्ही संघातील सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघाकडे अनेक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे.अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गोलंदाज आणि फलंदाजामध्ये तुल्यबळ सामना पाहायला मिळतो. खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात.. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो.. या मैदानावर 180 पर्यंत धावांच्या लक्षाचा पाठलाग होऊ शकतो.  नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते... पण सुरुवातीच्या षटकात येथे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या गोलंदाजाला यश मिळतेच. 


हेड टू हेड


गुजरात संघाचे आयपीएलमधील दुसरे वर्ष आहे. पहिल्याच वर्षी गुजरात संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. 2022 मध्ये पदार्पणातच गुजरात संघाने आयपीएलवर नाव कोरले. गेल्यावर्षी गुजरात आणि चेन्नई यांच्यात दोन सामने रंगले होते. दोन्ही सामन्यात गुजरात संघाने बाजी मारली होती. पहिल्या सामन्यात तीन तर दुसऱ्या सामन्यात सात विकेटने गुजरातने चेन्नईचा पराभव केला होता.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.