नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमच्या मुख्य प्रशिक्षक पदावरुन राहुल द्रविड (Rahul Dravid) निवृत्त होणार आहे. बीसीसीआयनं मुख्य प्रशिक्षक पदासाठी निवड प्रक्रिया सुरु केली आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जून ही आहे.भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) मेंटॉर असलेल्या गौतम गंभीरचं (Gautam Gambhir) नाव चर्चेत आहे. गौतम गंभीरचं नाव चर्चेत असलं तरी त्यानं अद्याप प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला नसल्याचं समोर आलंय. त्यामुळं गौतम गंभीरनं अर्ज का केला नाही याबाबत चर्चा सुरु आहेत. गौतम गंभीरनं उमेदवारी अर्ज दाखल न करण्यासाठी शाहरुख खान (Shah Rukh Khan) कारणीभूत असल्याचा दावा केला जातोय. 


गौतम गंभीरनं आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर म्हणून भूमिका पार पाडली आहे. गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघासोबत जोडला गेला अन् याच आयपीएलमध्ये ते अंतिम फेरीत पोहोचले आहेत. कोलकातासाठी गौतम गंभीर लकी ठरलाय, त्यामुळं केकेआरचा संघमालक शाहरुख खान सहजासहजी गौतम गंभीरला संघाची साथ सोडू देणार नसल्याच्या चर्चा आहेत. 


काही रिपोर्टनुसार गौतम गंभीरनं आतापर्यंत टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेला नाही. गंभीरनं अर्ज न करण्यामागील कारण तो सध्या केकेआरसोबत जोडला गेलेला आहे.  


शाहरुख खानशी चर्चा केल्यांनतर अर्ज करणार?


गौतम गंभीर आणि शाहरुख खान यांच्यात चांगलं बाँडिंग आहे. गौतम गंभीरनं केकेआरची साथ सोडावी, असं शाहरुख खानला वाटणार आहे. गंभीर ज्यावेळी लखनौ सुपर जाएंटसचा मेंटॉर म्हणून काम करत होता. त्यावेळी शाहरुख खाननं त्याला केकेआरसोबत पुन्हा काम करण्याची विनंती केली होती, अशी चर्चा आहे. शाहरुख खाननं त्याला कितीही रक्कम देण्याची तयारी दर्शवल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. 


'दैनिक जागरण' च्या वृत्तानुसार त्यांना एका सूत्रानं गौतम गंभीरनं टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत चर्चा केलेली नाही. गौतम गंभीर जर मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करणार असेल तर त्याला शाहरुख खान सोबत चर्चा करावी लागेल. शाहरुख खानला पुढील काही वर्ष गंभीरला केकेआरसोबत जोडून ठेवायचं आहे.  


संबंधित बातम्या : 


Indian Cricket Team Head Coach: गौतम गंभीर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी इच्छुक; महत्वाची अपडेट आली समोर


Indian Cricket Team Head Coach: भारतीय क्रिकेट संघाचा पुढील प्रशिक्षक कोण असावा...?; पाकिस्तानच्या वसीम आक्रमने खुल्या मनानं नाव सांगितलं!