चेन्नई :  आयपीएलच्या (IPL 2024) अंतिम फेरीतील दोन संघ आता निश्चित झाले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) आयपीएलच्या अंतिम फेरीच्या लढतीत आमने सामने येतील. सनरायजर्स हैदराबादनं राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) 36 धावांनी पराभूत केलं. बलाढ्य रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत करुन क्वालिफायरमध्ये प्रवेश मिळवलेल्या राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला.  पॅट कमिन्सनं (Pat Cummins) राजस्थान रॉयल्स विरुद्ध जी रणनीती वापरली त्यानं हैदराबादला विजय मिळाला. आयपीएलमध्ये क्वालिफायरपर्यंत फारशी बॉलिंग न करणाऱ्या अभिषेक शर्माला गोलंदाजी देण्याचा निर्णय पॅट कमिन्सनं घेतला. याच निर्णयाचा फायदा सनरायजर्स हैदराबादला झाला. 


पॅट कमिन्सनं जयदेव उनाडकटला बॉलिंग न देता अभिषेक शर्माला बॉलिंग दिली. अभिषेक शर्मानं आठव्या ओव्हरमध्ये संजू सॅमसनला बाद केलं.  आठव्या ते बाराव्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्मा आणि शाहबाज अहमदनं बॉलिंग केली. या दरम्यान राजस्थानच्या विकेटची माळ लागली. राजस्थान रॉयल्सनं 12 व्या ओव्हरपर्यंत 5 विकेट गमावल्या. अभिषेक शर्मानं हेटमायरला देखील बाद केलं. पॅट कमिन्सचा अभिषेक शर्माला बॉलिंग देण्याचा निर्णय गेमचेंजर ठरला. 


पाहा व्हिडीओ :




जिथं अश्विन चहल  फेल तिथं अभिषेक शर्मा अन् शाहबाज अहमदनं गेम फिरवला. शाहबाझ अहमदनं चार ओव्हरमध्ये  तीन विकेट 23 धावा देत घेतल्या. तर, अभिषेक शर्मानं चार ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या. शाहबाझ अहमदनं फॉर्ममध्ये असलेल्या यशस्वी जयस्वाल, रियान पराग, आर. अश्विनला बाद केलं.


अभिषेक शर्माला चार ओव्हर देण्याचा पॅट कमिन्सचा निर्णय फायदेशीर ठरला. अभिषेक शर्मा आणि शाहबाझ अहमदच्या आठ ओव्हरमध्ये राजस्थाननं पाच विकेट गमावल्या. दोघांच्या आठ ओव्हर्समध्येच राजस्थानच्या हातून मॅच निसटली. सनरायजर्स हैदराबादनं राजस्थान रॉयल्सला 36 धावांनी पराभूत करत अंतिम फेरीच्या लढतीत प्रवेश केला. 


पॅट कमिन्स सहा महिन्यात आणखी एक फायनल खेळणार


इम्पॅक्ट प्लेअर म्हणून शाहबाझ अहमदला पॅट कमिन्सनं संधी दिली. पॅट कमिन्सनं दिलेल्या संधीचं सोनं शाहबाझ अहमदनं केलं. पॅट कमिन्सनं ऑस्ट्रेलियाला आयसीसीच्या दोन स्पर्धा जिंकवून दिल्या. पॅट कमिन्सनं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव केला होता. त्यानंतर भारतात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये देखील भारताला पॅट कमिन्सनं पराभूत केलं होतं. भारताचा अंतिम फेरीच्या लढतीत पराभव करणाऱ्या पॅट कमिन्सनं आता सनरायजर्स हैदराबादला अंतिम फेरीच्या लढतीत पोहोचवलं आहे. 


संबंधित बातम्या :


गौतम गंभीर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी इच्छुक; महत्वाची अपडेट आली समोर

 

Video: धोनीचं रांचीत तर गंभीरने दिल्लीत केलं मतदान; माहीला पाहून बुथवर चाहत्यांची झुंबड