Chahal record IPL Marathi News : आयपीएलच्या मैदानात आज राजस्थान आणि पंजाब यांच्यामध्ये रॉयल सामना सुरु आहे. राजस्थानचा फिरकीपटू जयुवेंद्र चहलने पंजाबविरोधात पुन्हा एकदा धारधार गोलंदाजी केली. चहलने जॉनी बेयरस्टोला बाद करताच नव्या विक्रमला गवसणी घातली आहे. यंदाच्या हंगामात ही चहलची 20 वी विकेट होती. यंदा आयपीएलच्या हंगामात 20 पेक्षा जास्त बळी घेणारा चहल पहिलाच गोलंदाज ठरलाय. त्याशिवाय आयपीएलच्या हंगामात 20 पेक्षा जास्त बळी घेण्याची चहलची ही चौथी वेळ आहे. चहलने लसिथ मलिंगाच्या विक्रमाची बरोबरी केली. याआधी चहलच्या आधी लसिथ मलिंगाने आयपीएलच्या चार हंगामात 20 पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. आयपीएलच्या चार हंगामात चहल आणि मलिंगा यांनी प्रत्येकी 20 पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. 


पंजाबविरोधात धारधार गोलंदाजी करताना जयुवेंद्र चहलने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. चहलने पंजाबविरोधात तीन विकेट घेतल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये चहलने आतापर्यंत 11 सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत. चहलने आयपीएलमध्ये 20 विकेट घेण्याचा पराक्रम चौथ्यांदा केला.  आयपीएलमध्ये आतापर्यंत चार हंगामात चहल आणि मलिंगा यांनी प्रत्येकी 20-20  पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. त्यानंतर या यादील भुवनेश्वर कुमार, सुनिल नारायण आणि जसप्रीत बुमराह यांचा क्रमांक लागतो. यांनी तीन वेळा आयपीएलमध्ये 20 पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. तर ड्वेन ब्रावो, कगिसो रबाडा, मोहित शर्मा आणि राशिद खान यांनी आयपीएलमध्ये 20 पेक्षा जास्त विकेट घेण्याचा पराक्रम दोन वेळा केलाय. 


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या जॉनी बेअरस्टो आणि संघाला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, पंजाबच्या डावातील सहाव्या षटकात आर अश्विनच्या गोलंदाजीवर शिखर धवन झेल बाद झाला. त्यानंतर बेअरस्टो आणि भानुका राजपक्षेनं संघाचा डाव सावरत पुढे नेला. मात्र, दहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर भानुका राजपक्षेनं आपली विकेट्स गमावली. त्यानंतर मैदानात आलेल्या पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल स्वस्तात माघारी परतला. या सामन्यात लियाम लिव्हिंगस्टोनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात होती. पण प्रसिद्ध कृष्णानं त्याला बाद करून पंजाबच्या संघाला मोठा धक्का दिला. दरम्यान, जितेश शर्मा आणि ऋषी धवननं संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. जितेश शर्मानं 18 चेंडूत 38 धावा तर, ऋषी धवननं 2 चेंडूत 5 धावा केल्या.  पंजाबच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून राजस्थानसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. राजस्थानकडून युजवेंद्र चहलनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या आहेत. तर, प्रसिद्ध कृष्णा आणि आर अश्विनला यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली आहे.


राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन: 
जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार,विकेटकिपर), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसीद कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन.


पंजाब किंग्ज प्लेइंग इलेव्हन:
जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, मयंक अग्रवाल (कर्णधार), भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकिपर), ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा.