IPL 2022, RCB : आयपीएलच्या 15 व्या हंगामात आरसीबीने (Royal Challengers Bangalore) दणक्यात सुरुवात केली आहे. दहा गुणांसह आरसीबीचा संघ गुणतालिकेत (ipl points table 2022) दुसऱ्या क्रमांकावर आहे. संघाची कामगिरी आणि खेळाडूचा फॉर्म पाहाता यंदा आयपीएलच्या विजेतेपदासाठी आरसीबीला दावेदार मानले जात आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानेही यंदा आयपीएलच्या चषकावर आरसीबी नाव कोरणार असल्याचे सांगितलं आहे. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीचा संघ यंदा आयपीएलच्या चषकावर नाव कोरेल, असा विश्वास माइकल वॉन याने व्यक्त केला आहे. 


इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने यंदा आरसीबीला पसंती दर्शवली आहे. डु प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीचा संघ मायकल वॉनचा फेवरेट आहे. लखनौ सुपर जायंट्सचा  (LSG) आरसीबीने 18 धावांनी पराभव केल्यानंतर मायकल वॉन म्हणाला की, 'डु प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबी यंदा आयपीएल चषकावर नाव कोरेल यात शंकाच नाही.' मंगळवारी लखनौ विरोधात झालेल्या सामन्यात कर्णधार फाफ डु प्लेसिसने 96 धावांची खेळी केली, तसेच जोश हेजलवूडने चार विकेट घेतल्या. या बळावर आरसीबीने लखनौचा 18 धावांनी पराभव केला.  






आरसीबीने दिलेले लक्ष राहुलच्या नेतृत्वाली लखनौ संघाला पार करताना अपयश आले. लखनौनं सुरुवातीलाच विकेट गमावल्या. हेजलवूडने नव्या चेंडूवर आणि डेथ ओव्हरमध्ये विकेट घेतल्या. इतकेच नाही तर हेजलवूडने धावाही दिल्या नाहीत. त्यामुळेच बलाढ्य लखनौच्या फलंदाजांवर दबाव वाढला. आरसीबीच्या गोलंगदाजांनी ठरावीक अंताराने लखनौच्या फलंदाजांना बाद केले. परिणामी आरसीबीने सामना 18 धावांनी जिंकला. 


विराट कोहलीही प्रभावित -
आरसीबीचा माजी कर्णधार  विराट कोहलीही संघाच्या कामगिरीवर खूश झाला आहे. लखनौविरोधात विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीने आनंद साजरा केला. तसेच आणखी एक विजय... आणखी पुढे... पुढे जात आहोत... अशी प्रतिक्रिया दिली. 


हेही वाचा