LSG vs RCB, IPL 2022 : कर्णधार डु प्लेसिसची तुफानी फलंदाजी, त्यानंतर जोश हेजलवू़डचा भेदक मारा, या जोरावर आरसीबीने लखौनाचा 18 धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर लखनौचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसची जीभ घसरली. पंचाच्या एका निर्णायवर स्टॉयनिस रागाला गेला. रागाच्या भरात स्टॉयनिसने पंचाला शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


लखनौच्या 19 व्या षटकात मार्कस स्टॉयनिसची जीभ घसरली. 19 वे षटक टाकण्यासाठी आरसीबीकडून जोश हेजलवूड आला होता. फलंदाजीसाठी मार्कस स्टॉयनिस होता. सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये होता. हेजलवूडचा पहिला चेंडू पाचव्या यष्टीबाहेर होता. स्टॉयनिसने वाईड असल्याची दाद मागितली. मात्र पंचाने हा चेंडू योग्य असल्याचं सांगितलं. यावर स्टॉयनिसने हसून दाद दिली. मात्र, हेजलवूडच्या दुसऱ्या चेंडूवर स्टॉयनिसने स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. पण या चेंडूने थेट यष्ट्या उद्धवस्त केल्या. बाद झाल्यानंतर स्टॉयनिसला राग अनावर आला. यावेळी त्याने रागात पंचाला शिवीगाळ केली. स्टम्प माईकमध्ये आवाज कैद झाला. स्टॉयनिसचा रागात शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  


रोमांचक सामन्यात स्टॉयनिसने 15 चेंडूत 24 धावा केल्या. मोक्याच्या क्षणी बाद झाल्यामुळे स्टॉयनिसला राग अनावर आला अन् पंचाला शिवीगाळ केली. या सामन्यावर आरसीबीने कब्जा केला. 


पाहा व्हिडीओ.... 










स्टॉयनिसला फटकारले - 
मार्कस स्टॉयनिसला पंचाला शिवीगाळ केल्यामुळे फटकारले आहे. आयपीएल आचारसहिंतेचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत फटकारण्यात आले आहे. या प्रकारामुळे स्टॉयनिसला दंड ठोठावण्यात येईल, असं बोललं जात होतं. पण पहिलाच गुन्हा असल्यामुळे फक्त इशारा देण्यात आला आहे. या सामन्यात राहुलनेही आयपीएलच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. राहुलला 20 टक्केंचा दंड ठोठावण्यात आला आहे.