Virat Kohli, IPL 2022 Marathi News : मागील काही दिवसांपासून फॉर्मात नसलेला विराट कोहली लयीत आला आहे. गुजरातविरोधात विराट कोहलीने अर्धशतक झळकावलेय. यंदाच्या आयपीएल हंगामातील विराट कोहलीचे हे पहिलेच अर्धशतक आहे. विराट कोहलीचे हे कारकर्दीमधील 150 वे अर्धशतक होते. 


सलामीला आलेल्या विराट कोहलीने सुरुवातीला संयमी खेळी केली. वेळ घेत विराट कोहलीने गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली. दुसऱ्याच षटकात कर्णधार फाफ डु प्लेसिस बाद झाल्यानंतर दबाव वाढला होता. पण रजत पाटीदारबरोबर विराट कोहलीने संघाचा डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी पाटीदार आणि कोहलीमध्ये 90 पेक्षा जास्त धावांची भागिदारी झाली आहे. 


विराट कोहलीला आयपीएल 2022 मधील पहिल्या आठ सामन्यात आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नव्हती. विराट कोहलीने 8 सामन्यात 130 धावाही केल्या नव्हत्या. आतापर्यंत त्याची सर्वोच्च धावसंख्या ही 48 राहिली होती.  पण आता विराट कोहली फॉर्मध्ये  परतला आहे. विराट कोहलीने एक षटकार आणि सहा चौकारासह अर्धशतक झळकावलेय. विराट कोहलीने अर्धशतकानंतर देवाचे आभार मानले... विराट कोहलीवर खूप दिवसांपासून फॉर्म रुसला होता. या खेळीसह विराट कोहली फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत मिळाले आहेत. विराट कोहलीने चौफेर फटकेबाजी केली. 


विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर आरसीबीचे चाहते खूश झाले आहेत. अनेक दिग्गजांनीही ट्वीट करत विराट कोहलीची पाठ थोपटली आहे. 




5⃣0⃣ for @imVkohli! 👏👏

43rd #TATAIPL fifty for the #RCB opener! 👍

Follow the match ▶️ https://t.co/FVnv8ovvEQ #GTvRCB pic.twitter.com/OnYAutfN8H


— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2022




































हे देखील वाचा-