England Cricketers In IPL Auction 2024 : आयपीएल 2024 साठी 19 डिसेंबर रोजी लिलाव पार पडणार आहे. यामध्ये इंग्लंडचे 25 खेळाडू नशीब अजमावणार आहे. पण या सर्व खेळाडूंची वर्णी लागण्याची शक्यता कमीच आहे. इंग्लंडच्या फक्त पाच खेळाडूंची विक्री होण्याची शक्यता आहे. असे झालं तर इंग्लंडचे 20 खेळाडू अनसोल्ड राहतील.


इंग्लंडच्या कोणत्या खेळाडूंवर लागणार बोली ?


हॅरी ब्रूक याच्याशिवाय फिलिप साल्ट, सॅम बिलिंग्स, ख्रिस वोक्स आणि गस एटकिंसन या खेळाडूंवर आयपीएल संघाच्या नजरा असतील. यातील 4 खेळाडू याआधीच आयपीएल संघाचे सदस्य राहिलेत. हॅरी ब्रूक, फिलिप साल्ट, सॅम बिलिंग्स आणि ख्रिस वोक्स विविध आयपीएल संघाकडून खेळले आहेत. यावेळी गस एटकिंसन याचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे.


गेल्या वर्षी आयपीएल लिलावात सनरायझर्स हैदराबादने 13 कोटी रुपये खर्च करून हॅरी ब्रूकला आपल्या ताफ्यात घेतले होते.  पण हॅरी ब्रूक अपेक्षेप्रमाणे कामगिरी करु शकला नाही. तर फिलिप सॉल्ट दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. तर सॅम बिलिंग्स चेन्नई सुपर किंग्जचा भाग आहे. याशिवाय ख्रिस वोक्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स सारख्या संघांसाठी खेळला आहे. 
 


गस एटकिंसन पहिल्यांदाच आयपीएलच्या मैदानात -


इंग्लंडचा गस एटकिंसन पहिल्यांदाच आयपीएलच्या मैदानात उतरलाय. त्याने इंग्लंडसाठी नऊ वनडो आणि दोन टी 20 सामने खेळले आहेत. गस ऍटकिन्सनने 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 6.11 इकॉनॉमी आणि 35.36 च्या सरासरीने 11 खेळाडूंना बाद केले आहे.   2 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये त्याने 7.46 च्या इकॉनॉमी आणि 8.5 च्या सरासरीने 6 विकेट घेतल्या आहेत.


... तर इंग्लंडचे 20 खेळाडू राहणार अनसोल्ड ?


आदिल रशीद, टॉम कोहलर-कॅडमोर, सॅम्युअल हॅन, जेम्स विन्स, रेहान अहमद, ब्रायडन कार्स, टॉम करन, जॉर्ज गार्टन, जेमी ओव्हरटन, डेव्हिड विली, बेन डकेट, रिचर्ड ग्लीसन, ख्रिस जॉर्डन, टायमल मिल्स, ऑली रॉबिन्सन , जॉर्ज स्क्रिमशॉ, ऑली स्टोन, ल्यूक वुड, बेनी हॉवेल आणि ख्रिस वुड यासारख्या खेळाडूंच्या पदरी निराशा पडू शकते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, इंग्लंडचे 20 खेळाडू अनसोल्ड राहू शकतात.


333 खेळाडू लिलावात


19 डिसेंबर रोजी दुबाईमध्ये या 333 खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. यामधील 77 खेळाडू मालमाल होणार आहे. कारण, दहा संघाकडे फक्त 77 खेळाडूंची जागा शिल्लक आहे. 333 खेळाडूंपैकी 214 जण भारतीय आहेत तर 119 खेळाडू परदेशी (overseas players) आहेत.  दोन खेळाडू असोशिएट देशांचे आहेत. 116 खेळाडू आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत तर 215 खेळाडू अनकॅप (uncapped players) आहेत. 23 खेळाडूंनी आपली मूळ किंमत दोन कोटी रुपये ठेवली आहे तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये इतकी आहे. दहा संघामध्ये फक्त 77 खेळाडूंसाठी जागा शिल्लक आहे, त्यामध्ये 30 जागा या विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत.