Kavya Maran Love Story : सनरायझर्स हैदराबादचे मालक कलानिधी मारन (Kalanithi Maran) यांची मुलगी काव्य मारन आयपीएल सामन्यादरम्यान चर्चेत असती. हैदराबादच्या प्रत्येक सामन्यावेळी काव्या मारन स्टेडियमवर उपस्थित असते.  काव्या मारनचं सौंदर्य आणि हॉटनेसची सोशल मीडियावर चर्चा सुरु असते. काव्या मारन हिच्या रिलेशनशिप्सच्या नेहमीच चर्चा असतात. काव्या मारनकडून अद्याप रिलेशनशिपबाबत कोणताही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण काव्या मारनचे नाव अनेकांशी जोडले गेलेय, त्यामध्ये ऋषभ पंत, अभिषेक शर्मा यांच्या नावाचाही समावेश आहे. पाहूयात काव्या मारनच्या लव्ह लाइफमध्ये किती तथ्य आहे. 


ऋषभ पंतसोबत काव्य रिलेशनशिपमध्ये?


भारताचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत नेहमीच स्पॉटलाईटमध्ये असतो. त्याच्या लव्हलाईफच्या नेहमीच चर्चा सुरु असताता. ऋषभ पंत याचं नाव बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्यासोबत जोडलं होतं. पण यात कोणतेही तथ्य नसल्याचं समोर आले. मागील काही दिवसांपूर्वी हैदराबादची मालकीन काव्य मारन हिच्यासोबत ऋषभ पंत याचं नाव जोडलं होतं. पण यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले. पंत अथवा काव्य यांच्याकडून याबाबत कोणताही माहिती देण्यात आली नाही. 






अभिषेक शर्मासोबतही जोडलं नाव -


सनरायजर्स हैदराबादच्या एखाद्या खेळाडूनं शानदार कामगिरी केली, त्या त्या वेळी काव्य मारनची रिअॅक्शन व्हायरल होते. यंदाच्या हंगामात अभिषेक शर्माने वादळी फलंदाजी करत सर्वांनाच प्रभावित केले. अभिषेक शर्मा चौकार षटकार मारतो, तेव्हा काव्या मारन स्टेडियममध्ये जल्लोष करताना दिसते. त्यामुळे अभिषेक शर्मा आणि काव्या मारन यांच्या नात्याची चर्चा सुरु झाली. पण यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं समोर आलेय. कारण, दोन्ही बाजूकडून याबाबत कोणतीही माहिती अथवा दुजेरा देण्यात आला नाही.






संगीतकार अनिरुद्ध रविचंदरसोबत रिलेशनमध्ये?


काही दिवसांपूर्वी नॅशनल क्रश काव्या मारनचे नाव भारतीय संगीतकार अनिरुद्ध रविचंदरसोबतही जोडले गेले होते. काव्या आणि  अनिरुद्ध यांच्या प्रेमसंबंधांच्या बातम्यांनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली होती. परंतु अनिरुद्धने काव्यासोबतच्या आपल्या नात्याच्या बातम्या पूर्णपणे फेटाळून लावल्या होत्या. मैत्रीशिवाय दुसरे काहीही नसल्याचे सांगितले होते. अनिरुद्ध त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे काही शेअर करत नाही.


यावरुन स्पष्ट होते की, काव्या मारन सध्या सिंगल असून ती कोणाला डेट करत नाही. सध्या तिचं संपूर्ण लक्ष कुटुंबाचा व्यवसाय पुढे नेण्यावर आहे.






कोण आहे काव्या मारन?
काव्या मारनचा जन्म 6 ऑगस्ट 1992 रोजी चेन्नईमध्ये झाला. 33 वर्षीय काव्या मारन ही सन ग्रुप आणि आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचे मालक कलानिती मारन यांची मुलगी आहे. ती सनरायझर्स हैदराबाद आयपीएल टीमची मालक आणि सीईओ आहे. काव्याची एकूण संपत्ती 409 कोटी रुपये आहे. काव्याने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बीकॉम केले आहे, त्यानंतर तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे. काव्याचे आजोबा एम करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री होते.