CSK vs DC, IPL 2024 : दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत यानं नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऋतुराज गायकवाडचा चेन्नई संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. दिल्लीच्या संघात दोन मोठे बदल झाले आहेत, तर चेन्नईच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, चेन्नईने पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे, ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीच्या संघाचा पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव झालाय. दिल्लीचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. दिल्ली पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे.


दिल्लीमध्ये दोन बदल - 


कुलदीप यादव दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याला आराम देण्यात आला आहे. कुलदीप यादव याच्या जागेवर दिल्लीने ईशांत शर्मा याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले आहे. तर रिकी भुईच्या जागी पृथ्वी शॉ याला प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे चेन्नईच्या संघाने कोणताही बदल केलेला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ कायम उतरवला आहे. 






दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग 11


दिल्ली कॅपिटल्सची  प्लेईंग 11 : ऋषभ पंत (कर्णधार), डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, एनरिक नॉर्खिया, ईशांत शर्मा, खलील अहमद, मुकेश कुमार


राखीव खेळाडू - सुमित कुमार, कुमार कुशाग्रा, रशिख सलाम, प्रविण दुबे


Delhi Capitals: 1Shaw, 2 Warner, 3 Marsh, 4 Pant (capt, wk), 5 Stubbs, 6 Porel, 7 Axar, 8 Nortje, 9 Mukesh, 10 Ishant, 11 Khaleel


Impact Players Sumit Kumar, Kumar Kushagra, Rasikh Salam, Pravin Dubey, Jake Fraser-McGurk


चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग XI : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डेरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिजवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चाहर, मथिशा पथिराणा, तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान


राखीव खेळाडू - शिवम दुबे,  शार्दुल ठाकूर, राशीद , मोईन अली, मिचेल सँटनर


Chennai Super Kings: 1 Gaikwad (capt), 2 Ravindra, 3 Rahane, 4 Mitchell, 5 Jadeja, 6 Rizvi, 7 Dhoni (wk), 8 Chahar, 9 Pathirana, 10 Deshpande, 11 Mustafizur


Impact Players: Dube, Shardul, Rasheed, Moeen, Santner


हेड टू हेड स्थिती कशी आहे ?


दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आयपीएलचे 29 सामने झाले आहेत. यामध्ये चेन्नईने 19 वेळा विजय मिळवलाय, तर दिल्लीला फक्त 10 सामन्यात विजय मिळवता आला आहे. म्हणजेच, आकड्यावरुन सध्या तरी चेन्नईचं पारडं जड असल्याचे दिसतेय.