Delhi vs Kolkata, Qualifier 2 : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आज दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) एकमेकांविरोधात मैदानावर उतरणार आहेत. शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना खेळवण्यात येईल. भारतात खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात खराब कामगिरीनंतर कोलकाताच्या संघानं दुसऱ्या टप्प्यात कर्णधार इयोन मोर्गन (Eoin Morgan) च्या नेतृत्त्वात उत्तम खेळी करत वापसी केली. आयपीएल 2014 प्रमाणे संघ पुन्हा एकदा किताब जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. पण कोलकातासमोर दिल्लीचं आव्हान आहे. कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या दिल्लीच्या संघानं पॉइंट्स टेबल (Points Table) मध्ये सर्वात अव्वल स्थान पटकावलं होतं. अशातच आज दिल्ली किताबावर नाव पटकावण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. तसेच कोलकाता आपल्या तिसऱ्या आयपीएल किताबावर नाव कोरण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्याची शक्यता आहे. 


कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) च्या अनुभवाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) आधीच आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे. अशातच आयपीएलच्या सामन्यांबाबत बोलायचं तर दोन्ही संघांमध्ये या सीझनच्या दुसऱ्या टप्प्यातील सामना शारजाहमध्ये खेळवण्यात आला होता. जिथे दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्यांदाच फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 128 धावांचं लक्ष्य ठेवलं. त्याचं उत्तर म्हणून कोलकातानं 18.2 ओव्हर्समध्ये 7 विकेट्स गमावत लक्ष्य गाठलं होतं. कोलकाताच्या वतीनं नितीश राणानं नाबाद 36 धावांची खेळी केली होती. तर शुभमन गिलनं 30 आणि सनील नरेननं 21 धावांचं योगदान दिलं होतं. संघासाठी व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन आणि लॉकी फरग्युसनने प्रत्येकी दोन विकेट्स आपल्या नावे केल्या होत्या. 


पहिल्या टप्प्यात दिल्लीच्या संघानं मिळवला विजय


यापूर्वी भारतात अहमदाबादमध्ये दोन्ही संघांमध्ये आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात पृथ्वी शॉची धमाकेदार खेळी पाहायला मिळाली. पृथ्वीच्या खेळीच्या जोरावर दिल्लीनं सात विकेट्सनी विजय मिळवला. केकेआरनं फलंदाजी करत या सामन्यात सहा विकेट्स गमावत 154 धावा केल्या होत्या. हे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पृथ्वी शॉच्या (41 चेंडूमध्ये 82 धावा) ची धमाकेदार खेळीच्या जोरावर सामना जिंकला होता. 


काय सांगतात हेड टू हेडचे आकडे? 


कोलकाता आणि दिल्लीचा संघ आयपीएलमध्ये 28 वेळा एकमेकांविरोधात खेळले आहेत. आकड्यांवर नजर टाकली तर दोन्ही संघांमध्ये जास्त अंतर नाही. केकेआरनं जिथे 15 वेळा बाजी मारली आहे. तिथे दिल्लीच्या संघानं 13 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दोन्ही संघांमध्ये आजच्या सामन्यात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. 


दोन्ही संघ Playing 11 मध्ये बदल करण्याची शक्यता कमी 


आज खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये दोन्ही संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये ऑलराउंडर मार्कस स्टोयनिस आणि कोलकाताच्या संघात ऑलराउंडर आंद्रे रसेलची वापसी होऊ शकते. परंतु, अद्याप या दोघांच्या खेळण्याबाबत कोणतंही स्पष्टीकरण मिळालेलं नाही. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. संघाच्या वरच्या फळीत दिल्लीकडे शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्यासरखे धडाकेबाज खेळाडू आहेत. मधल्या फळीत श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि शिमरन हेटमायर यांच्यासारखे खेळाडू आहेत. 


अशातच एलिमिनेटर सामन्यात केकेआरनं आरसीबीचा पराभव करत त्यांना परतीचा रस्ता दाखवला. अशातच आजच्या सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी संघ पूर्णपणे प्रयत्न करताना दिसणार आहे. 


संभाव्य संघ : 


कोलकाता नाइट राइडर्सचा संभाव्य संघ : शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, इयोन मोर्गन (कर्णधार), नितीश राणा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाकिब अल हसन, सुनील नरेन, लॉकी फर्ग्यूसन,  वरुण चक्रवर्ती आणि शिवम मावी.



दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य संघ : शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), शिमरोन हेटमायर, टॉम कर्रन, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कॅगिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे आणि आवेश खान.