CSK vs SRH IPL 2024:हैदराबादचा होम ग्राऊंडवर दुसरा विजय, चेन्नई एक्स्प्रेसला पराभवाचा धक्का

CSK vs SRH IPL 2024: हैदराबादमधील राजीव गांधी मैदानावर हा सामना रंगणार आहे.

मुकेश चव्हाण Last Updated: 05 Apr 2024 10:58 PM
हैदराबादचा चेन्नईवर 6 विकेटनं विजय

सनरायजर्स हैदराबादनं चेन्नई सुपर किंग्जवर सहा विकेटनं विजय मिळवला आहे. चेन्नईनं दिलेलं 166 धावांचं आव्हानं हैदराबादनं 19 व्या ओव्हरमध्ये पार केलं. 

हैदराबादला विजयसाठी 15 धावांची गरज

हैदराबादला विजयसाठी 15 धावांची गरज आहे.हैदराबादनं 17 ओव्हर्समध्ये 4 बाद  151 धावा केल्या आहेत.  

हैदरबादची वादळी सुरुवात, पॉवरप्लेमध्ये 78 धावा

हैदरबादनं वादळी सुरुवात केली असून पॉवरप्लेमध्ये 1 बाद 78 धावा केल्या आहेत. 

हैदराबादची आक्रमक सुरुवात, दुसऱ्या ओव्हरमध्ये काढल्या 27 धावा

अभिषेक शर्मान फटकेबाजी करत दुसऱ्या ओव्हरमध्ये 27 धावा काढल्या. हैदराबादनं दुसऱ्या ओव्हरपूर्वी 35 धावा केल्या. 

CSK vs SRH : चेन्नईला हैदराबादच्या फलंदाजांनी रोखलं, 5 विकेटवर 165 धावांपर्यंत मजल

चेन्नई सुपर किंग्जनं 20 ओव्हरमध्ये  5 विकेटवर 165 धावा केल्या आहेत. हैदराबादच्या गोलंदाजांनी चेन्नईल्या फलंदाजांना मोठे फटके मारु दिले नाहीत. 

चेन्नईला तिसरा धक्का, शिवम दुबे 45 धावांवर बाद

पॅट कमिन्सनं जाळं टाकत शिवम दुबेला 45 धावांवर बाद केलं. 

CSK vs SRH : चेन्नई सुपर किंग्जचा डाव शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणेनं सावरला

CSK vs SRH : चेन्नई सुपर किंग्जचा डाव शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणेनं सावरला आहे. शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणेच्या भागिदारीच्या जोरावर चेन्नईनं 13 व्या ओव्हरअखेर 2 बाद 115 धावा केल्या आहेत. 

CSK vs SRH : चेन्नईला दुसरा धक्का, ऋतुराज गायकवाड 26 धावांवर बाद

चेन्नई सुपर किंग्जला दुसरा धक्का बसला असून ऋतुराज गायकवाड 26 धावा करुन बाद झाला आहे. 

CSK vs SRH : चेन्नईला दुसरा धक्का, ऋतुराज गायकवाड 26 धावांवर बाद

चेन्नई सुपर किंग्जला दुसरा धक्का बसला असून ऋतुराज गायकवाड 26 धावा करुन बाद झाला आहे. 

CSK vs SRH : चेन्नईची सावध सुरुवात, रहाणे अन् ऋतुराज गायकवाडनं डाव सावरला

चेन्नई सुपर किंग्जनं आज डावाची सुरुवात सावधपणे केली आहे. पहिल्या सहा ओव्हरमध्ये चेन्नईनं 1 बाद 48  इतक्या धावा केल्या. अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाडनं चेन्नईचा डाव सावरला.

CSK vs SRH : चेन्नईला पहिला धक्का, रचिन रवींद्र बाद

चेन्नई सुपर किंग्जनं डावाची सुरुवात सावधपणे केली होती. चौथ्या ओव्हरमध्ये रचिन रवींद्र 12 धावा करुन बाद झाला. भूवनेश्वर कुमारला यंदाच्या आयपीएलमधील पहिली विकेट मिळाली.  

CSK vs SRH : हैदराबादनं टॉस जिंकला, पॅट कमिन्सनं घेतला मोठा निर्णय

हैदराबादनं टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पॅट कमिन्सनं चेन्नई सुपर किंग्जला पहिल्यांदा चेन्नईला फलंदाजीला आमंत्रित केलं.  

CSK vs SRH : हैदराबादनं टॉस जिंकला, पॅट कमिन्सनं घेतला मोठा निर्णय

हैदराबादनं टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पॅट कमिन्सनं चेन्नई सुपर किंग्जला पहिल्यांदा चेन्नईला फलंदाजीला आमंत्रित केलं.  

SRH vs CSK Toss Update : चेन्नई की हैदराबाद पहिल्यांदा फलंदाजी करणार, थोड्याच वेळात टॉस होणार

चेन्नई की हैदराबाद पहिल्यांदा फलंदाजी करणार हे थोड्याच वेळात समजणार आहे.  थोड्याच वेळात टॉस होणार आहे. 

हैदराबाद आणि चेन्नई यांच्यात थोड्याच वेळात टॉस

हैदराबाद आणि चेन्नई यांच्यात थोड्याच वेळात टॉस होईल. आजच्या मॅचमध्ये कोण विजय मिळवणार हे पाहावं लागणार आहे.

हेनरिक क्लासेनवर सर्वांचं लक्ष

सनरायजर्स हैदराबादच्या हेनरिक क्लासेनच्या फलंदाजीकडे सर्वांच लक्ष आहे. हेनरिकनं 2024 च्या आयपीएलमध्ये तीन मॅचमध्ये 167 धावा केल्या आहेत.

मुस्तफिजूर रहमान आजच्या मॅचमध्ये चेन्नईच्या संघात नसणार कारण समोर

चेन्नई सुपर किंग्जचा बॉलर मुस्तफिजूर रहमान व्हिसाच्या प्रक्रियेसाठी बांगलादेशला गेल्यानं आजच्या मॅचसाठी तो उपलब्ध नाही. 

सनरायझर्स हैदराबादचा संघ चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या लढाईसाठी सज्ज

शार्दुल ठाकुरला आज संधी मिळणार?

पाहा 11 खेळाडूंची टीम, आज तुम्हाला करेल मालामाल

मैदान कोण मारणार?

चेन्नईने या मोसमात आत्तापर्यंत 3 सामने खेळले आहेत. यामध्ये दोन सामने जिंकले आहेत आणि एका सामन्यात पराभव झाला आहे. दुसरीकडे हैदराबादनेही 3 सामने खेळले आहेत, मात्र त्यांना केवळ 1 सामना जिंकता आला आहे. 

खेळपट्टी कशी असेल?

हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये गेल्या काही काळापासून फलंदाजांच्या मदतीची खेळपट्टी पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत चेन्नई आणि हैदराबाद यांच्यातील उच्च धावसंख्यांचा सामना पाहायला मिळेल. या मैदानावर मुंबईविरुद्ध खेळताना हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या 277 धावांची केली होती. प्रत्युत्तरात मुंबई संघाने 20 षटकांत 246/5 ​​अशी मजल मारली. आता चेन्नई आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यातही फलंदाजीची खेळपट्टी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ

मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (W), शाहबाज अहमद, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, उपेंद्र यादव, राहुल त्रिपाठी, टी नटराजन, अनमोलप्रीत सिंग, झटावेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंग

चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ:

रुतुराज गायकवाड (C), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (W), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पाथीराना, मुस्तफिजुर रहमान, शार्दुल रहमान, मुस्तफिजुर रहमान शेख रशीद, मोईन अली, मिचेल सँटनर, डेव्हॉन कॉनवे, अजय जाधव मंडल, प्रशांत सोळंकी, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, आरएस हंगरगेकर, महेश थेक्षाना, निशांत सिंधू, अरावेली अवनीश

पार्श्वभूमी

CSK vs SRH IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) सामना होणार आहे. हैदराबादमधील राजीव गांधी मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होईल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.