Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bengaluru) 2008 सालानंतर पहिल्यांदाच चेपॉक स्टेडियमवर विजय मिळवताना चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) 50 धावांनी पराभव केला. यासह बंगळुरूने यंदाच्या सत्रातील सलग दुसरा विजय मिळवताना गुणतालिकेत अव्वल स्थानही पटकावले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 20 षटकांत 7 बाद 196 धावा केलेल्या बंगळुरूने चेन्नईला 20 षटकांत 8 बाद 146 धावांवर रोखले.

चेन्नईने नाणेफेक जिंकून बंगळुरुला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बंगळुरुचा कर्णधार राजत पाटीदारने 32 चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या, ज्यामुळे बंगळुरुला 20 षटकांत सात बाद 196 धावा करता आल्या. दरम्यान बंगळुरुकडून सलामीवीर फिल सॉल्टने आक्रमक सुरुवात केली होती. तर विराट कोहलीकडून (Virat Kohli) सावध खेळी पाहायला मिळाली. सॉल्टने 16 चेंडूत 32 धावा केल्या. तर विराट कोहलीने 30 चेंडूत 31 धावा केल्या. 

पहिला चेंडू हेल्मेटला आदळला, इगो हर्ट झाला-

दरम्यान, चेन्नईकडून वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना गोलंदाजी करत असताना एक चेंडू विराट कोहलीच्या हेल्मेटवर आदळला. यानंतर विराट कोहलीने आक्रमक होत दुसऱ्याच चेंडूवर षटकार टोलावला. षटकार मारल्यानंतर विराट कोहली थोडापुढे गेला आणि मथिशा पाशिरानाला काहीतरी बडबडला. विराट कोहलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चेन्नईचा फ्लॉप शो-

चेन्नईच्या फिरकी गोलंदाजांनी जादू काही चालली नाही. एकीकडे, रविचंद्रन अश्विनने 2 षटकांत 22 धावा दिल्या. तर रवींद्र जडेजाने 3 षटकांत 37 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही. नूर अहमदने 3 विकेट्स घेतल्या, पण त्याने 9 च्या इकॉनॉमी रेटने धावाही दिल्या. चेन्नईचे दुसऱ्या क्रमांकापासून पाचव्या क्रमांकापर्यंतचे सर्व फलंदाज अपयशी ठरले. रचिन रवींद्रने 41 धावा केल्या, पण संघाचे नशीब बदलण्यात तो अपयशी ठरला. तसेच 16 चेंडूत 30 धावांची खेळी करून एमएस धोनीने चाहत्यांची मने जिंकली. धोनीने शेवटच्या षटकांमध्ये 3 चौकार आणि 2 षटकार मारले.

संबंधित बातमी:

MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...