MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...

MS Dhoni : महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं 50 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला आला.

महेंद्रसिंह धोनी

1/5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं चेन्नई सुपर किंग्जला 50 धावांनी पराभूत केलं. आरसीबीनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 196 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ 146 धावांपर्यंत पोहोचला. यात महेंद्रसिंह धोनीनं 30 धावा केल्या.
2/5
चेन्नईकडून सर्वाधिक 41 धावा राचिन रवींद्रनं केल्या. त्यानंतर सर्वाधिक धावसंख्या धोनीची ठरली. धोनीनं 16 बॉलमध्ये 30 धावा केल्या. धोनी नाबाद राहिला मात्र चेन्नईला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
3/5
महेंद्रसिंह धोनीला नवव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यावरुन माजी खेळाडूंनी संताप व्यक्त केला आहे. भारताच्या टी 20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या इरफान पठाननं यावर नाराजी व्यक्त केली आहे.
4/5
इरफान पठाण म्हणाला की मी कधीच महेंद्रसिंह धोनीनं नवव्या स्थानावर फलंदाजी करावी या बाजूनं नसेन, चेन्नई संघासाठी देखील हे आदर्शवत नाही, असं तो म्हणाला.
5/5
दरम्यान, महेंद्रसिंह धोनीनं नाबाद 30 धावांची खेळी केली. यात त्यानं 2 षटकार आणि तीन चौकार मारले.
Sponsored Links by Taboola