IPL 2025 Dream11 Tips : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 मध्ये आज (28 मार्च) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध सामना रंगणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पाच वेळा चॅम्पियन असलेल्या सीएसकेने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) ला हरवले. पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या आरसीबीने पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला हरवले.
आयपीएलमध्ये आतापर्यंत सीएसके आणि आरसीबी यांच्यात 33 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये चेन्नईचा संघ 21-11 ने पुढे आहे आणि एक सामना रद्द झाला. आयपीएल 2024 मध्ये, दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले ज्यामध्ये दोघांनीही प्रत्येकी एक विजय नोंदवला. गेल्या हंगामात, आरसीबीविरुद्ध पराभव पत्करून सीएसके संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग-11 वरही सर्वांचे लक्ष आहे.
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ या सामन्यासाठी दोन बदल करू शकतो. चेपॉकच्या संथ खेळपट्टीचा विचार करता, आरसीबी संघ टिम डेव्हिडच्या जागी इंग्लिश क्रिकेटपटू जेकब बेथेलला प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट करू शकतो. तसेच, अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (भुवी) देखील या सामन्यात खेळताना दिसू शकतो. दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमार केकेआरविरुद्ध खेळू शकला नाही. रसिक सलाम दारच्या जागी भुवनेश्वरला प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.
दुसरीकडे, चेन्नईचा संघ मुंबईविरुद्धच्या सामन्यात जिंकण्यास मदत करणारा संघच मैदानात उतरवू शकतो. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना देखील फिट नसल्याने या सामन्यासाठी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत, फक्त नॅथन एलिस हा सामना खेळताना दिसेल.
पिच रिपोर्ट
चेन्नईची खेळपट्टी फिरकीपटूंना खूप मदत करू शकते आणि अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकल्यानंतर दोन्ही संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन -
चेन्नई सुपर किंग्ज - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, शिवम दुबे, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, सॅम करन, नूर अहमद, खलील अहमद, नाथन एलिस
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - रजत पाटीदार (कर्णधार), फिल साल्ट, विराट कोहली, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, यश दयाल, जोश हेझलवूड, रसिक सलाम, सुयश शर्मा
आजच्या CSK VS RCB सामन्याची बेस्ट ड्रीम-11
पहिला संघ - फिल साल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार, रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, लियाम लिव्हिंगस्टोन, कृणाल पंड्या, जोश हेझलवुड, खलील अहमद, नूर अहमद
कर्णधार - विराट कोहली, उपकर्णधार - ऋतुराज गायकवाड
दुसरा संघ : फिल साल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार, रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कृणाल पंड्या, जोश हेझलवुड, खलील अहमद, नूर अहमद
कर्णधार - रचिन रवींद्र, उपकर्णधार - फिल साल्ट
नोट - फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात.