CSK vs MI, IPL 2023 Live: चेन्नई आणि मुंबईत रंगतदार लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

CSK vs MI Live Score: आयपीएलमधील ‘एल क्लासिको’ म्हणून ओळखल्या जाणारा चेन्नई विरुद्ध मुंबई सामन्याकडे आज सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नामदेव कुंभार Last Updated: 06 May 2023 07:02 PM
चेन्नईचा मुंबईवर विजय

चेन्नईचा मुंबईवर सहा विकेटने विजय

चेन्नईला चौथा धक्का

कॉनवेच्या रपाने चेन्नईला चौथा धक्का बसला

चेन्नईला तिसरा धक्का

चेन्नईला तिसरा धक्का बसलाय.. स्टब्सने रायडूला बाद केले

चेन्नईला दुसरा धक्का

अजिंक्य रहाणेच्या रुपाने चेन्नईला दुसरा धक्का बसला आहे. पीयूष चावलाने रहाणेला बाद केले

चेन्नईला पहिला धक्का, पीयूष चावलाने घेतली विकेट

चेन्नईला पहिला धक्का, पीयूष चावलाने घेतली विकेट... ऋतुराज गायकवाड ३० धावांवर बाद

मुंबईची १३९ धावांपर्यंत मजल

मुंबईने निर्धारित २० षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात १३९ धावांपर्यंत मजल मारली.

मुंबईला सातवा धक्का बसलाय

मुंबईला सातवा धक्का बसलाय

मुंबईला आणखी एक धक्का

टिम डेविडच्या रुपाने मुंबईला आणखी एक धक्का बसलाय. टेविड दोन धावांवर बाद झालाय

मुंबईला तगडा धक्का

नेहाल वढेरा याला बाद करत पथीराणा याने मुंबईला धक्का दिला. नेहाल वढेरा याने ६४ धावांची खेळी केली

जाडेजाने जोडी फोडली

सूर्यकुमार यादवला २६ धावांवर बाद करत जाडेजाने मुंबईला चौथा धक्का दिला. सूर्यकुमार आणि नेहाल वढेरा यांची जोडी जमली होती.. पण जाडेजाने ही जोडी फोडत मुंबईच्या अडचणी वाढवल्या.

मुंबईची फलंदाजी ढेपाळली

पावरप्लेमध्ये मुंबईच्या फलंदाजांनी हराकिरी केली. कॅमरुन ग्रीन, ईशान किशन आणि रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतले. पावरप्लेमध्ये तीन विकेट गमावल्या

मुंबईला मोठा धक्का

रोहित शर्मा याला शून्यावर बाद करत दीपक चाहर याने मुंबईला मोठा धक्का दिला... 

मुंबईला दुसरा धक्का

ईशान किशनच्या रुपाने मुंबईला दुसरा धक्का बसला आहे. किशन स्वस्तात तंबूत परतलाय.. 

मुंबईला पहिला धक्का

तुषार देशपांडेने मुंबईला पहिला धक्का दिला आहे. कॅमरुन ग्रीन याला स्वस्तात तंबूत पाठवलेय

इशान किशनचे आयपीएलमध्ये दोनशे चौकार पूर्ण

इशान किशनचे आयपीएलमध्ये दोनशे चौकार पूर्ण झाले आहेत

ईशान किशन आणि कॅमरुन ग्रीन मैदानावर

ईशान किशन आणि कॅमरुन ग्रीन मैदानावर फलंदाजीसाठी उतरले आहेत. 

मुंबईच्या संघात दोन बदल

तिलक वर्मा आजच्या सामन्यात खेळणार नाही. दुखापतग्रस्त असल्यामुळे तिलक वर्मा आजच्या सामन्याला मुकला आहे. राघव गोयल याला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलेय. त्याशइवाय ट्रिस्टन स्टब्स यालाही स्थान दिलेय.. 

CSK Playing 11 : चेन्नई सुपर किंग्स

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा.

MI Playing 11 : मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, टीम डेव्हिड, नेहाल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयुष चावला, अर्शद खान, राघव गोयल

चेन्नईची प्रथम गोलंदाजी

चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेपॉक स्टेडिअमवर मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. धोनीने प्लेईंग ११ मध्ये कोणताही बदल केला नाही. मागील सामन्यातील संघ कायम ठेवलाय.. दुसरीकडे मुंबईच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. 

चेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

चेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

थोड्याच वेळात नाणेफेक होणार आहे. चेपॉकच्या खेळपट्टीवरनाणेफीकाच कौल कोण जिंकणार...

धोनीसाठी चाहत्यांची गर्दी

एल-क्लासिको म्हणजे काय?

एल-क्लासिको (El Clásico) हा स्पॅनिश शब्द असून याचा अर्थ उत्कृष्ट असा आहे. दोन उत्कृष्ट संघांमधील लढत म्हणून दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांतील सामन्याला एल क्लासिको म्हटलं जातं. फुटबॉलमध्ये, बार्सिलोना आणि रिअल माद्रिद यांच्यातील सामन्याला एल क्लासिको म्हणतात, कारण दोन्ही संघ लीगमधील सर्वात यशस्वी क्लब आहेत. त्याचप्रमाणे, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामन्याला एल क्लासिको म्हणतात. कारण, मुंबई इंडियन्स संघ सर्वाधिक 5 वेळा आयपीएल विजेता आहे. तर, चेन्नई संघही 4 वेळा आयपीएल विजेता ठरला आहे. 

आज आयपीएल 2023 मध्ये एल-क्लासिको सामना

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) या दोन संघाच्या सामन्याला एल-क्लासिको असं म्हटलं जातं. या दोन संघांच्या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं असतं. दोन्ही संघ सर्वाधिक वेळा आयपीएल चॅम्पियन असून संघांचा चाहतावर्ग देखील फार मोठा आहे.

IPL 2023, MI vs CSK Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

IPL 2023, CSK vs MI : कधी आणि कुठे होणार सामना?

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना 6 मे रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिअमवर रंगणार आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजता खेळवला जाणार असून त्याआधी दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.

CSK vs MI Head to Head : कुणाचं पारड जड?

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आतापर्यंत 35 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईचं पारडं जड दिसून आलं आहे. 35 सामन्यांपैकी मुंबई संघाने 20 सामने तर चेन्नई संघाने 15 सामने जिंकले आहेत. पण यंदाच्या मोसमात याआधी झालेल्या सामन्यात चेन्नईनं मुंबईचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार असून याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

MI vs CSK Match 49 Preview : चेन्नई विरुद्ध मुंबई

मुंबई संघाने सलग दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून संघ विजयाची हॅटट्रिक मारण्याचा प्रयत्न करेल. मुंबईने मागील सामन्यात पंजाबचा तर त्याआधीच्या सामन्यात राजस्थानचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे चेन्नई संघ सलग दोन सामन्यात पराभवानंतर आजच्या सामन्यात उतरणार आहे. मुंबई विरुद्धचा सामना जिंकून चेन्नई संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल.

आयपीएलमधील ‘एल क्लासिको’ सामना

आयपीएलमधील ‘एल क्लासिको’ म्हणून ओळखल्या जाणारा चेन्नई विरुद्ध मुंबई सामन्याकडे आज सर्वांचं लक्ष लागलं आहे. यंदाच्या मोसमातील दुसरा एल-क्लासिको सामना आज पार पडणार आहे. मागच्या सामन्यात लखनौमध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे, धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि लखनौ संघातील सामना रद्द झाला आणि दोन्ह संघांना प्रत्येकी एक-एक गुण देण्यात आला. चेन्नई संघ मागील तीनपैकी दोन सामने गमावल्यानंतर विजयाच्या शोधात आहे. तर मुंबईची विजयी वाटचाल सुरु आहे. 

MA Chidambaram Stadium Pitch Report : चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium) म्हणूनही ओळखले जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या स्टेडियमवर फिरकीपटूंचं वर्चस्व आहे. अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळणाचे प्रमाण जास्त असू शकतं. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो.

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 49, CSK vs MI : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये डबल हेडर सामने पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात आज, 06 मे रोजी चेन्नईच्या घरच्या मैदानावर पार पडणार आहे. एमए चिदंबरम स्टेडिअमवर (MA Chidambaram Stadium) सामना रंगणार आहे. दुपारी 3.30 वाजता हा सामना रंगणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि महेंद्र सिंह धोनी यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. यंदाच्या मोसमात या दोन संघांमध्ये याआधी रंगलेल्या सामन्यात चेन्नईनं मुंबईचा पराभव केला होता. धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई संघाने मुंबईचा सात विकेट्सने पराभव केला. आयपीएल 2023 मधील 12 व्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी आज मुंबई संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरेल.

MI vs CSK Match 49 Preview : चेन्नई विरुद्ध मुंबई

मुंबई संघाने सलग दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून संघ विजयाची हॅटट्रिक मारण्याचा प्रयत्न करेल. मुंबईने मागील सामन्यात पंजाबचा तर त्याआधीच्या सामन्यात राजस्थानचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे चेन्नई संघ सलग दोन सामन्यात पराभवानंतर आजच्या सामन्यात उतरणार आहे. मुंबई विरुद्धचा सामना जिंकून चेन्नई संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल.

CSK vs MI Head to Head : कुणाचं पारड जड?

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आतापर्यंत 35 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईचं पारडं जड दिसून आलं आहे. 35 सामन्यांपैकी मुंबई संघाने 20 सामने तर चेन्नई संघाने 15 सामने जिंकले आहेत. पण यंदाच्या मोसमात याआधी झालेल्या सामन्यात चेन्नईनं मुंबईचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार असून याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

आज आयपीएल 2023 मध्ये एल-क्लासिको सामना

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) या दोन संघाच्या सामन्याला एल-क्लासिको असं म्हटलं जातं. या दोन संघांच्या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं असतं. दोन्ही संघ सर्वाधिक वेळा आयपीएल चॅम्पियन असून संघांचा चाहतावर्ग देखील फार मोठा आहे.

एल-क्लासिको म्हणजे काय?

एल-क्लासिको (El Clásico) हा स्पॅनिश शब्द असून याचा अर्थ उत्कृष्ट असा आहे. दोन उत्कृष्ट संघांमधील लढत म्हणून दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांतील सामन्याला एल क्लासिको म्हटलं जातं. फुटबॉलमध्ये, बार्सिलोना आणि रिअल माद्रिद यांच्यातील सामन्याला एल क्लासिको म्हणतात, कारण दोन्ही संघ लीगमधील सर्वात यशस्वी क्लब आहेत. त्याचप्रमाणे, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामन्याला एल क्लासिको म्हणतात. कारण, मुंबई इंडियन्स संघ सर्वाधिक 5 वेळा आयपीएल विजेता आहे. तर, चेन्नई संघही 4 वेळा आयपीएल विजेता ठरला आहे. 

MA Chidambaram Stadium Pitch Report : चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium) म्हणूनही ओळखले जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या स्टेडियमवर फिरकीपटूंचं वर्चस्व आहे. अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळणाचे प्रमाण जास्त असू शकतं. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो.

IPL 2023, CSK vs MI : कधी आणि कुठे होणार सामना?

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना 6 मे रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिअमवर रंगणार आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजता खेळवला जाणार असून त्याआधी दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023, MI vs CSK Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.