CSK vs MI: चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2024 च्या 29 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने 20 धावांनी विजय मिळवला. मुंबईकडून रोहित शर्माने एकट्यानं लढा दिला. रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. 


रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात नाबाद शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला, पण त्याचा संघ सामना जिंकू शकला नाही. रोहितने आपल्या शतकी खेळीत 63 चेंडूत 105 धावा केल्या, ज्यात त्याने 11 चौकार आणि 5 षटकारही मारले. रोहितशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला चेन्नईविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र रोहितच्या या खेळीवर हार्दिक पांड्याने साधं कौतुकही केलं नाही. सामना संपल्यानंतर हार्दिकने मुलाखत दिली. त्यात शिवम दुबे, एमएस धोनी, मथिशा पथिराणाचं तोंड भरून कौतुक केलं. मात्र रोहित नावही घेतलं नाही. 






सामन्यानंतर हार्दिक पांड्या नेमकं काय म्हणाला?


निश्चितपणे लक्ष्य गाठता आले असते, पण चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि मथिशा पथिराणाने चांगले चेंडू टाकले. तो त्याच्या प्लॅन्समध्ये खूप हुशार होता आणि त्याने लाँग बाऊंड्रीचा खूप चांगला वापर केला. तो गोलंदाजीसाठी येण्याआधी सामना आमच्या ताब्यात होता. स्टम्पच्या मागे एक माणूस उभा आहे, जो त्यांना योग्य डावपेच शिकवणार, हे त्यांना माहिती आहे, असं म्हणत हार्दिकने धोनीचे कौतुक केली. शिवम दुबेला फिरकीपेक्षा वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळणे कठीण झाले असते, असं हार्दिक म्हणाला. आम्ही काहीतरी वेगळे करू शकलो असतो. आम्हाला चांगले क्रिकेट खेळण्याची गरज आहे, असं हार्दिकने सांगितले.


17व्या मोसमात मुंबईचा चौथा पराभव-


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली 17व्या मोसमात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पहिले तीन सामने गमावल्यानंतर मुंबईने दिल्ली आणि आरसीबीविरुद्ध विजय मिळवून दमदार पुनरागमन केले, मात्र एल क्लासिको सामन्यात पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले.


संबंधित बातम्या:


सामन्याआधी मिठी मारली, मग षटकार मारण्यासारखे चेंडू टाकले; भारतीय संघाच्या माजी कर्णधाराने उपस्थित केले प्रश्न


टी-20 विश्वचषकाच्या संघात शिवम दुबेला सामील न केल्यास त्याला CSK जबाबदार; माजी क्रिकेटपटूचं विधान


7 वर्षे डेट, लग्नाआधीच 1 मुलगा; किरॉन पोलार्डची पत्नी आहे मोठ्या ब्रँडची मालकीण, पाहा Photo's