CSK vs MI IPL 2025 Rohit Sharma : इंडियन प्रीमियर लीगचा अठरावा हंगाम आता फक्त एका आठवड्यात सुरू होणार आहे. आरसीबीपासून ते सीएसके आणि दिल्ली-मुंबई इंडियन्सपर्यंत सर्वांनी मेगा लिलावात चांगला संघ तयार केला होता. आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 23 मार्च रोजी चेन्नईमध्ये एल क्लासिको सामना रंगणार आहे. 


मुंबई आणि चेन्नई हे या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहेत. गेल्या हंगामात एमआयने कर्णधार बदलला होता. त्याने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे संघाची कमान सोपवली. पण आता पुन्हा एकदा कर्णधारपदात बदल होऊ शकतो. जर आपण प्लेइंग इलेव्हनबद्दल बोललो तर, मुंबईसाठी रोहितसोबत रायन रिकल्टन सलामीला येऊ शकतो.


गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सने कर्णधार बदलला होता. याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड संताप होता. रोहितला कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर खेळाडूही आनंदी नव्हते, असा दावा अनेक माध्यमांनी केला आहे. पण, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. पण आता रोहितला पुन्हा एकदा कर्णधारपद दिले जाऊ शकते.


मधल्या फळीत तिलक वर्मा- सूर्यकुमार यादवचा तडाखा


मुंबईचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आहे. पहिल्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये मुंबई विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव यांना संधी देऊ शकते. दोघेही तगडे खेळाडू आहेत. सूर्याने अनेक वेळा स्फोटक फलंदाजी केली आहे. तिलक वर्मा मधल्या फळीत स्थान मिळू शकते. चेन्नईविरुद्ध नमन धीर आणि मिचेल सँटनरही मैदानात उतरू शकतात.


हार्दिक पांड्या पहिल्या सामन्यातून बाहेर...


गेल्या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी खूपच खराब होती आणि मुंबई संघ शेवटच्या स्थानावर राहिला. एवढेच नाही तर त्याच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध तिसऱ्यांदा मुंबई इंडियन्सला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला. नियमांनुसार, संघाच्या कर्णधाराला तीन वेळा स्लो ओव्हर रेटसाठी 30 लाख रुपये दंड आणि एका सामन्यासाठी बंदी घातली जाते. कारण मुंबई इंडियन्सने ग्रुप स्टेजमध्ये स्लो ओव्हर रेटची चूक केली होती आणि त्यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला नाही. यामुळे हार्दिक पांड्यावर बंदी घालता आली नाही. अशा परिस्थितीत, त्याला आयपीएल 2025 मध्ये बंदी घालण्यात येईल आणि चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सलामीच्या सामन्यात त्याला बाहेर बसावे लागेल.


खतरनाक वेगवान गोलंदाज...


मुंबईकडे अनेक स्टार गोलंदाज आहेत. ट्रेंट बोल्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये असणार हे जवळजवळ निश्चित आहे. दीपक चहरलाही मैदानात उतरण्याची संधी मिळू शकते. पण जसप्रीत बुमराहबद्दल अजूनही शंका आहे. जर तो पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर तो चेन्नईविरुद्ध मैदानात उतरू शकतो.


मुंबई इंडियन्सचा संभाव्य संघ : रायन रिकेलटन, रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, नमन धीर, मिशेल सँटनर, जसप्रीत बुमराह, दीपक चहर आणि ट्रेंट बोल्ट.