Chennai Super Kings vs Mumbai Indians : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये डबल हेडर सामने पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात आज, 06 मे रोजी चेन्नईच्या घरच्या मैदानावर पार पडणार आहे. एमए चिदंबरम स्टेडिअमवर (MA Chidambaram Stadium) सामना रंगणार आहे. दुपारी 3.30 वाजता हा सामना रंगणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि महेंद्र सिंह धोनी यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. यंदाच्या मोसमात या दोन संघांमध्ये याआधी रंगलेल्या सामन्यात चेन्नईनं मुंबईचा पराभव केला होता. धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई संघाने मुंबईचा सात विकेट्सने पराभव केला. आयपीएल 2023 मधील 12 व्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी आज मुंबई संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरेल.


MI vs CSK Match 49 Preview : चेन्नई विरुद्ध मुंबई


मुंबई संघाने सलग दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून संघ विजयाची हॅटट्रिक मारण्याचा प्रयत्न करेल. मुंबईने मागील सामन्यात पंजाबचा तर त्याआधीच्या सामन्यात राजस्थानचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे चेन्नई संघ सलग दोन सामन्यात पराभवानंतर आजच्या सामन्यात उतरणार आहे. मुंबई विरुद्धचा सामना जिंकून चेन्नई संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल.


CSK vs MI Head to Head : कुणाचं पारड जड?


इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आतापर्यंत 35 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईचं पारडं जड दिसून आलं आहे. 35 सामन्यांपैकी मुंबई संघाने 20 सामने तर चेन्नई संघाने 15 सामने जिंकले आहेत. पण यंदाच्या मोसमात याआधी झालेल्या सामन्यात चेन्नईनं मुंबईचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार असून याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.


IPL 2023, CSK vs MI : कधी आणि कुठे होणार सामना?


मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना 6 मे रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिअमवर रंगणार आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजता खेळवला जाणार असून त्याआधी दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.


IPL 2023, MI vs CSK Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : 'दुर्दैवी विकेट्स आणि भागीदारीचा अभाव'; मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव, प्रशिक्षक मार्क बाऊचरनं सांगितलं खरं कारण