CSK vs DC, IPL 2023 : कर्णधार एमएस धोनी आणि रविंद्र जाडेजा यांची फटकेबाजी आणि शिवम दुबे याच्या वादळामुळे चेन्नईने 167 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईने निर्धारित 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 167 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीकडून मिचेल मार्श याने तीन विकेट घेतल्या. दिल्लीला विजयासाठी 168 धावांची गरज आहे.
नाणफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फॉर्मात असलेले ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांनी संयमी सुरुवात करुन दिली.. पण चेन्नईचा डाव सावरला.. चेन्ईच्या एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. कॉनवे आणि गायकवाड यांनी 32 धावांची सलामी दिली. डेवेन कॉनवे 10 धावा काढून तंबूत परतला. तर ऋतुराज गायकवाड 24 धावांवर बाद झाला. दिल्लीच्या अक्षर पटेल याने दोघांना तंबूचा रस्ता दाखवला. ऋतुराज बाद झाल्यानंतरम मोईन अली आणि अजिंक्य रहाणे यांनाही फार काळ मैदानात तग झरता आला नाही. मोईन अली अवघ्या सात धावांवर बाद झाला... त्याला कुलदीप यादवने बाद केले. तर अजिंक्य रहाणे याला ललीत यादव याने बाद केले. अजिंक्य रहाणे याने 21 धावांची खेळी केली. यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता.
आघाडीचे चार फलंदाज बाद झाल्यानंतर चेन्नईचा डाव ढेपाळला असेच वाटले.. पण युवा शिवम दुबे आणि अंबाती रायडू यांनी चेन्नईच्या डावाला आकार दिला. दोघांनी आक्रमक फलंदाजी करत चेन्नईची धावसंक्या वाढवली. शिवम दुबे याने 12 चेंडूत 25 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन खणखणीत षटकार लगावले. दुबे याची खेळी मिचेल मार्श याने संपुष्टात आणले. अंबाती रायडूने17 चेंडूत 23 धावांचे योगदान दिले. रायडूने आपल्या खेळीत एक षटकार आणि एक चौकार लगावला. शिवम दुबे आणि अंबाती रायडू यांनी 19 चेंडूत 36 धावांची भागिदारी केली.
रायडू आणि दुबे बाद झाल्यानंतर जाडेजा आणि धोनीने चेन्नईचा डाव सावरला. दोघांनी झटपट धावांचा पाऊस पाडला. धोनी आणि जाडेजा यांनी 18 चेंडूत 38 धावांची भागिदारी केली. चेन्नईकडून ही सर्वात मोठी भागिदारी होय. दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. रविंद्र जाडेजाने 16 चेंडूत 21 धावांचे योगदान दिलेय. यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. धोनीने 9 चेंडूत 20 धावांचे योगदान दिले. यामध्ये दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. धोनी आणि जाडेजा यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे चेन्नईचा डाव 167 पर्यंत पोहचला.
दिल्लीची गोलंदाजी कशी?
दिल्लीच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. पहिल्या चेंडूपासून दिल्लीकरांनी अचूक टप्प्यावर मारा केला. मिचेल मार्श याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. मिचेल मार्श याने तीन षटकात 18 धावांच्या मोबदल्यात तीन फंलदाजांना तंबूत पाठवले. अक्षर पटेल याने दोन विकेट घेतल्या आहेत. तर खलील अहमद, ललीत यादव आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.