IPL 2023: आयपीएल 2023 साठी सर्व संघ खेळाडूंना ट्रेड आणि रिटन करण्यात व्यस्त आहेत. फ्रंचायझींना येत्या मंगळवारपर्यंत (15 नोव्हेंबर 2022) त्यांच्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडं (BCCI) पाठवायची आहे. यातच गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज यष्टीरक्षक मॅथ्यू वेडला (Matthew Wade) रिटेन केल्याची माहिती समोर येत आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सनं मॅथ्यू वेडला 2.40 कोटीत विकत घेतलं होतं. 

आयपीएलच्या मागच्या हंगामात मॅथ्यू वेडनं गुजरातसाठी 10 सामने खेळले होते. ज्यात 15.70 च्या सरासरीनं आणि 113 च्या स्ट्राइक रेटनं एकूण 157 धावा केल्या. वेड 2011 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (दिल्ली कॅपिटल्स) साठी खेळला होता. त्या हंगामात त्याने फक्त तीन सामने खेळले, ज्यात त्यानं फलंदाजी करताना 22 धावा केल्या.

लॉकी फॉर्ग्युसन, रहमानउल्ला गुरबा संघातून रिलीज
गुजरात टायटन्सनं लॉकी फॉर्ग्युसन आणि रहमानउल्ला गुरबाज यांना ट्रेडिंगद्वारे केकेआरला दिलंय. लॉकी फर्ग्युसननं गेल्या मोसमात 13 सामन्यात 12 विकेट घेतल्या होत्या. यासोबतच आयपीएल 2022 मधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. गुजरात टायटन्सनं 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये लॉकी फर्ग्युसनवर 10 कोटींची बोली लावली होती. 

2021 च्या विश्वचषकाचा हिरो
2021च्या टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा संघ चॅम्पियन ठरला होता. ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅथ्यू वेडचं मोठं योगदान होतं. या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये पाकिस्ताविरुद्ध 17 चेंडूंत 41 धावांची नाबाद खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला. त्यानं आपल्या खेळीत दोन चौकार आणि चार षटकार मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 241.18 होता. मात्र, या टी-20 विश्वचषकात त्याची बॅट शांत राहिली.

वर्ष आयपीएल विजेत्यांची यादी
2008 राजस्थान रॉयल्स
2009 डेक्कन चार्ज
2010 चेन्नई सुपरकिंग्ज
2011 चेन्नई सुपरकिंग्ज
2012 कोलकाता नाईट रायडर्स
2013 मुंबई इंडियन्स
2014 कोलकाता नाईट रायडर्स
2015 मुंबई इंडियन्स
2016 सनरायझर्स हैदराबाद
2017 मुंबई इंडियन्स
2018 चेन्नई सुपर किंग्ज
2019 मुंबई इंडियन्स
2020 मुंबई इंडियन्स
2021 चेन्नई सुपरकिंग्ज
2022 गुजरात टायटन्स

हे देखील वाचा-