IPL 2022, MI vs CSK : आयपीएल स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मुंबईचा गुरुवारी मैदानात उतरणार आहे. पण मुंबईपुढे तगड्या चेन्नईचं आव्हान असेल. मुंबई आणि चेन्नई आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहेत. या दोन्ही संघाची यंदाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. मुंबईला पहिल्या सहाही लढतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर सहा सामन्यात चेन्नईचे पाच पराभव झाले आहेत. त्यामुळे आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आयपीएलमधील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी एकमेंकासमोर उभे राहतील. 


 पाच वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. चेन्नईचीही यंदाची कामगिरी वेगळी नाही. चेन्नईलाही पाच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे दोन्ही संघावर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे. चेन्नई अथवा मुंबईला यापुढे एक पराभव प्ले ऑफमधील आव्हान संपुष्टात होऊ शकते. अशातच स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघ एकमेंकासमोर उभे ठाकतील. 


 मुंबईसाठी सर्वात मोठी चिंता कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म आहे. रोहित शर्माला अद्याप आपल्या लौकिकास साजेशी कामगीर करता आलेली नाही. रोहितने सहा सामन्यात फक्त 114 धावा काढल्या आहेत. मुंबई मोठी धावसंख्या उभा करायची असल्यास अथवा धावांचा पाठलाग करायचा असल्यास रोहित शर्माची फलंदाजी महत्वाची आहे.  कायरन पोलार्ड, इशान किशन यांनाही आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. 15.5 कोटी रुपयात खरेदी केलेल्या ईशान किशनने सहा सामन्यात दोन अर्धशतकाच्या मदतीने 191 धावा चोपल्यात. डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव चांगल्या लयीत आहेत. मात्र, त्यांना इतर फलंदाजांकडून साथ मिळत नाही.  फलंदाजीसोबत मुंबईची गोलंदाजीही कमकुवत जाणवत आहे. बुमराहचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला विकेट घेण्यात अथवा धावा रोखण्यात यश आलेलं नाही. टायमल मिल्स, जयदेव उनादकट, बासिल थंपी आणि मुरुगन अश्विन यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. 


 चेन्नईसाठी जमेची बाजू म्हणजे सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड फॉर्ममध्ये परतला आहे. गायकवाडने गुजरातविरोधात दमदार अर्धशतकी खेळी केली. रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांनी आरसीबीविरोधात तुफानी फलंदाजी केली होती. चेन्नईची चिंतेची बाजू म्हणजे  अंबाती रायुडू आणि मोईन अली यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही.  जाडेजालीही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. राहुल चाहरच्या अनुपस्थितीत चेन्नईची गोलंदाजी कमकुवत दिसत आहे. ड्वेन ब्रावो आणि स्पिनर महेश तीक्ष्णा यांचा अपवाद वगळता चेन्नईच्या गोलंदाजांना भेदक मारा करण्यात अपयश आलेय.