MI in IPL  Playoffs : पाच वेळा आयपीएल जिंकणारा मुंबई संघ गुणतालिकेत आघाडीच्या चार संघामध्ये आहे. सोळाव्या हंगामातील अखेरच्या टप्प्यात मुंबईने दमदार कामगिरी केली आहे. मागील चार सामन्यात मुंबईने तीन विजय धावांचा पाठलाग करुन मिळवले आहेत.. 9 मे रोजी मुंबईने आरसीबीचा सहा विकेटने पराभव करत प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकलेय.  रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईचे 11 सामन्यात 12 गुण आहेत. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी मुंबईला उर्वरित सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल. मुंबईच्या संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी काय समीकरणे आहेत ते पाहूयात... त्याआधी मुंबईचे उर्वरित सामने कुणासोबत आणि कुठे आहेत, ते जाणून घेऊयात... 


मुंबई इंडियन्सचे तीन सामने बाकी राहिलेत.. पाहूयात कुणासोबत भिडणार आहे फलटन-  


12 मे रोजी गुजरात आणि मुंबई यांच्यामध्ये वानखेडेवर सामना रंगणार आहे. 


16 मे रोजी लखनौ विरोधात मुंबईचा सामना रंगणार आहे. हा सामना इकाना स्टेडिअमवर होणार आहे. 


21 मे रोजी वानखेडे मैदानावर हैदराबाद आणि मुंबई यांच्यात लढत होणार आहे. 


मुंबई इंडियन्स कोणत्या तीन समीकरणाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवणार - 


समीकरण 1 - 


मुंबई इंडियन्सने आपल्या उर्वरित तिन्ही सामने जिंकले तर 18 गुण होतील.. असे झाले तर मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान आरामात मिळू शकते...
 
समीकरण 2 -  


तीन सामन्यापैकी मुंबईने दोन सामने जिंकले तर मुंबईचे 16 गुण होतील.. असे झाल्यास 16 गुणासंह प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता कमी होते.. नेटरनरेट चांगला असला तर 16 गुणासह मुंबई प्लेऑफमध्ये पोहचू शकते.. 


समीकरण 3 -  


मुंबई इंडियन्सला फक्त एका सामन्यात विजय मिळवता. तर पाच वेळच्या विजेत्याचे प्लेऑफमधील आव्हान खडतर होईल. मुंबई इंडियन्सचे फक्त 14 गुण होतील.. अशात नेटरनरेट मोठी भूमिका बजावू शकते. त्याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवरही मुंबईचे प्लेऑफमधील स्थान ठरू शकते. 


12 गुणांसह मुंबई सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. तर आरसीबी, पंजाब, कोलकाता या संघाचे प्रत्येकी 10 गुण आहेत..  आज मुंबईचा सामना गुजरातसोबत घरच्या मैदानावर होणार आहे. वानखेडेवर सामना जिंकत प्लेऑफच्या दिशेने आगेकूच करण्याचा प्रयत्न मुंबई करणार आहे. रोहित शर्माचा फॉर्म आणि गोलंदाज ही मुंबईसाठी डोकेदुखी ठऱत आहेत. आज रोहित शर्म कशी कामगिरी करतोय.. याकडे सर्वाचं लक्ष लागलेय.






आणखी वाचा :

IPL 2023 : दिल्लीचा IPL मधील गाशा गुंडाळला, पराभवाची कारणे काय? 


IPL 2023 : खत्‍म-टाटा-बाय-बाय... या 10 खेळाडूंची अखेरची आयपीएल स्पर्धा!