IPL 2023 Points Table : दिल्लीचा 27 धावांनी पराभव करत चेन्नईने प्लेऑफच्या दिशेने वाटचाल केली आहे. पथीराणा आणि दीपक चाहर यांनी दिल्लीचा अर्धा संघ तंबूत धाडला. चेन्नईने दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ 140 धावांपर्यंत मजल मारु शकला. चेन्नईचा 12 सामन्यातील हा सातवा विजय होय.. या विजयासह चेन्नईचे 15 गुण झाले आहेत. तर दिल्लीचा 11 सामन्यातील हा सातवा पराभव होय. दिल्ली 8 गुणांसह तळालाच आहे. त्याशिवाय दिल्लीचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलेय. चेन्नई आणि दल्ली यांच्यातील सामन्याने गुणतालिकेत फारसा बदल झालेला नाही... पण चेन्नईचे गुणतालिकेत स्थिती मजबूत झाली. 


चेन्नई आणि गुजरात मजबूत स्थितीत - 


चेन्नई आणि गुजरात गुणतालिकेत मजबूत स्थितीत आहेत. 16 गुणांसह गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे तर 15 गुणांसह चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघाचा नेटरनरेटही चांगला आहे.  दोन्ही संघाचे प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित मानले जातेय. गुजरातने 11 सामन्यात 16 गुणांची कमाई केली आहे तर चेन्नई 12 सामन्यात 15 गुणांची कमाई केली आहे. चेन्नईचे आणखी दोन सामने बाकी आहेत.. तर गुजरातचे तीन सामने शिल्लक आहेत.. त्यामुळे या दोन्ही संघाचा प्रवेश निश्चित मानला जातोय. 


मुंबईने आरसीबीचा पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेफ घेतली आहे. वानखेडेवर मुंबईने आरसीबीचा दारुण पराभव केला होता. हा मुंबईचा सहावा विजय होता. 12 गुणांसह मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर लखनौ 11 सामन्यात 11 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. 






इतर संघांची स्थिती काय?
राजस्थान (RR), कोलकाता (KKR), बंगळुरु (RCB) आणि पंजाब (PBKS) संघाकडे प्रत्येकी 10 गुण आहेत. पण, नेट रनरेटमुळे संघांच्या क्रमवारीत बदल झाला आहे. राजस्थान रॉयल्स पाचव्या क्रमांकावर आहे. तर, कोलकाता सहाव्या क्रमांकावर आहे. कोलकाता आणि राजस्थान दोन्ही संघांनी त्यांचे 11 पैकी पाच सामने जिंकले आणि सहा सामने गमावले आहेत. मुंबई कडून पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ पाच क्रमांकावरून थेट सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. 


आयपीएल गुणतालिकेत पंजाब किंग्स आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पंजाब संघाने आतापर्यंत 11 पैकी पाच सामने जिंकले तर सहा सामने गमावले आहेत. त्यानंतर सनरायजर्स हैदराबाद संघ सध्या नवव्या तर दिल्ली कॅपिट्ल्स दहाव्या स्थानावर आहे. हैदराबाद आणि दिल्ली दोन्ही संघानी त्यांच्या 10 पैकी चार सामन्यांत विजय मिळवला तर सहा सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. दोन्ही संघांकडे आठ गुण आहेत.