Bihar CM Nitish Kumar Announce Prize Money Vaibhav Suryavanshi : आयपीएल 2025 चा 47 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. हा सामना आयपीएलच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय ठरला, कारण यामध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने वर्ल्ड क्रिकेटमध्ये आपल्या असा पराक्रम केला आहे की ज्यावर विश्वास ठेवणे खूप कठीण आहे. सूर्यवंशीने गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांना चकवा देत फक्त 35 चेंडूत शतक झळकावले. अशाप्रकारे, तो आयपीएल तसेच टी-20 स्वरूपात शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज बनला.

Continues below advertisement

याशिवाय, त्याने आयपीएलमध्ये एक भारतीय म्हणून सर्वात जलद शतक करण्याचा विक्रमही केला. सूर्यवंशीची आता सर्वत्र चर्चा होत आहे आणि त्यांच्या कामगिरीवर खूश होऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही मोठी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. वैभव सूर्यवंशी हा बिहारचा आहे आणि त्याने खूप कमी वेळात रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे. गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्ससमोर 210 धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु सूर्यवंशीच्या 38 चेंडूत नाबाद 101 धावांच्या खेळीमुळे आरआरने केवळ 15.5 षटकांत हे लक्ष्य गाठले, जे आयपीएलमधील कोणत्याही संघाकडून 200 पेक्षा जास्त धावांचे सर्वात जलद लक्ष्य गाठण्याचा विक्रम आहे.

नितीश कुमार यांनी ट्विट करत केले कौतुक...

Continues below advertisement

बिहारच्या पोराच्या या विक्रमी खेळीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोशल मीडिया अकाउंटवरून वैभव सूर्यवंशीचे कौतुक करणारे ट्विट केले आणि 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले. ट्विटमध्ये लिहिले आहे की, "आयपीएलच्या इतिहासात शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू (14 वर्षे) ठरलेला बिहारचा वैभव सूर्यवंशी यांचे अभिनंदन. सर्वाना त्याचा अभिमान आहे. मी 2024 मध्ये वैभव सूर्यवंशी आणि त्यांच्या वडिलांना भेटलो आणि त्यावेळी मी त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आयपीएलमधील त्यांच्या चमकदार कामगिरीनंतर मी त्यांना फोनवरून अभिनंदनही केले. बिहारमधील युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी यांनाही राज्य सरकारकडून 10 लाख रुपयांचे मानधन देण्यात येईल.   

वैभव सूर्यवंशी यांचे केवळ बिहारच्या मुख्यमंत्र्यांनीच कौतुक केले नाही तर क्रिकेटमधील दिग्गजही त्यांचे कौतुक करत आहेत. सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, भारतीय कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा आणि टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव यांनीही सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले.

हे ही वाचा -

Vaibhav Suryavanshi IPL 2025 : तोडफोड फटकेबाजी केल्यानंतर वैभव सूर्यवंशीबद्दल शुभमन गिल काय म्हणाला? ज्यामुळे अजय जडेजा संतापला