RR vs GT, IPL 2025: सोमवारी सामन्यात पाहायला मिळाले ते राजस्थान संघाचे खरोखरचे वैभव. ..सायमन केटीच यांनी या वैभवाचे नामकरण केले ते बॉस बेबी या नावाने... त्याला कारण होते त्याने युनिव्हर्सल बॉस गेल सारखी केलेली कामगिरी... दोन्ही ही डावखुरे... आयपीएल स्पर्धेतील पहिली दोन वेगवान शतके यास दोघांच्या नावावर... एक युनिव्हर्सल बॉस आणि एक बेबी बॉस...
सोमवारी 210 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला वैभव आज त्याचे वय... समोरील गोलंदाजांची मोठी नावे... भय... या साऱ्या गोष्टी तंबूत ठेवून आला... तो चालत येताना घेऊन आला ती वीरेंद्र सेहवागची निडरता, सचिन तेंडुलकर यांचे टेम्परामेंट... विराट कोहली याची दृढनिश्चयता... रोहित शर्माची कलात्मकता...सूर्यकुमार यादव याचा आत्मविश्वास... आणि ब्रायन लारा याचा फॉलो थ्रू...या सगळ्या गोष्टी आज एकच खेळीत पाहायला मिळाले..काल सिराज याचा एकच चेंडू गुड लेन्थ वर पडून.त्याच्या बॅटच्या जवळून गेला तो एकच चेंडू तो अडखळत खेळला त्यानंतर त्याने सिराजच्या गोलंदाजीवर त्याच्याच डोक्यावरून षटकार खेचून आपल्या खेळीची सुरुवात केली.. त्याने मारलेले काही फटके थर्ड मॅन परिसरात षटकारांचा रूपाने गेले... तेवढेच फटक्यांसाठी तो नशीब घेऊन आला होता... इतर वेळी त्याने गोलंदाजांना गुलाम बनविले...
38 चेंडू 101 धावा 11 षटकार 7 चौकार 265 इतका स्ट्राईक रेट हे सगळे करणारा मुलगा फक्त 14 वर्षाचा आहे.. ही फक्त दंत कथा असू शकली असती...पण या भारत भूमीत अशा दंत कथा प्रत्यक्षात खऱ्या करणाऱ्या माणसांचा इतिहास आहे आज जयपूर मध्ये तोच इतिहास सूर्यवंशींच्या भूमीत वैभव ने खरा करून दाखविला..
अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"
या ओळी कवी कुसुमाग्रजांनी कोलंबस साठी लिहिल्या असतील ही. ...पण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात या ओळी जगणारे कोलंबस वेळोवेळी जन्मास येत असतात आज क्रिकेटच्या मैदानातील आणखीन एका कोलंबसाचा जन्म झाला..ज्याने राजस्थान संघाची देहबोली बदलून टाकली...
मैदानात कुठल्या भागात या मुलाने फटके मारले नाहीत...आणि कुठला फटका खेळला नाही...आज तो फक्त रॅम्प आणि रिव्हर्स रॅम्प खेळला नाही..कारण याची त्याला गरजच वाटली नाही...त्याने खणखणीत ड्राईव्ह मारले....दमदार पुल मारले.. कलात्मक फ्लिक मारले...देखणे पिक अप मारले..ईशांत शर्मा... प्रसिद्ध कृष्ण..यांच्या डोळ्यात पाणी आणले...आणि करीम जनत याच्या एकाच षटकात 3 चौकार आणि 3 षटकार मारून शतकाकडे झेप घेतली...आज वैभव याने प्रसिद्ध च्या गोलंदाजीवर बॅकफूट वर जाऊन एक्स्ट्रा कव्हर वरून जो षटकार मारला तेव्हा सगळ्या समलोचकांनी तोंडांत बोट घातली...तो इतका सुंदर खेळत होता की षटक संपल्यावर आणि टाइम आऊट मध्ये सर्वजण मारी बिस्किटच्या निरर्थक आणि रटाळ जाहिरात पाहत होते पण एक चेंडू सुद्धा मिस करीत नव्हते...अशी किमया सचिन तेंडुलकर यांची असायची आज तोच अनुभव दिला..
वैभव आणि यशस्वी यांनी 166 धावांची सलामी दिल्यानंतर सामना राजस्थान संघाचा झाला..यात यशस्वी 70 धावा काढून नाबाद राहिला...
नाणेफेक जिंकून रियान पराग याने प्रथम फलंदाजी गुजरात संघाला दिली..गुजरात संघाने 93 धावांची सलामी देऊन मोठ्या धावसंखेकडे कूच केलं..काल साई,गिल आणि बटलर यांनी आपल्या फटाक्यांचे प्रदर्शन भरविले होते. शुभमन याने सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह...ट्रेडमार्क शॉर्ट आर्म पुल...आणि लोफ्टेड ड्राईव्ह या फटक्यांच्या मदतीने 50 चेंडूत 84 धावांची खेळी केली...त्याला बटलर ने 26 चेंडूत 50 धावा काढून साथ दिली... 209 धावा कदचित इतर दिवशी पुरेशा ठरल्या असत्या...पण कालचा दिवस वैभव सूर्यवंशी याचा होता...त्याच्या फटक्यांचे आभाळ गुजरात संघाच्या गोलंदाजीवर कोसळले...
या आधी त्याने 20 चेंडूत 34 धावा आणि 12 चेंडूत 16 धावा केल्या होत्या...बाद झाल्यावर तो निराश मनाने तंबूत जात असे..पण ज्या संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आहेत त्यांना अशी निराशा कशी घालवायची हे माहित आहे. .त्यांनी कदचित गदिमांच्या खालील ओळी वैभव याच्या कानात गुणगुणल्या असतील...
होशी काय निराश तू होसी काय निराश
पाय तळाशी अचला धरणी अचल शिरी आकाश
मार्ग नियोजित हेतू निर्मळ आडवीलं तुज किती वावटळ धुली कणातून आरपार बघयेतो सूर्यप्रकाश...
त्याचे नावंच सूर्यवंशी आहे त्याला निराशेच्या धुलीकणातून आरपार पाहायला फार वेळ लागला नाही...