IPL 2022 Flop XI : आयपीएलच्या 15 व्या हंगामात अनेक नवीन खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यामध्ये मुंबईचा तिलक वर्मा, पंजाबचा अर्शदीप, लखनौचा आयुष बडोनी यांचा समावेश आहे. तर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि आरसीबीच्या विराट कोहलीसाठी यंदाचं वर्ष निराशाजनक राहिलेय. दोघांचीही बॅट शांतच आहे. त्याशिवाय रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह यांनाही लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. आयपीएलमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पाहूयात यंदाच्या हंगामातील फ्लॉप 11 खेळाडूबद्दल..
 
रोहित शर्मा - मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासाठी यंदाचा हंगाम निराशाजनक राहिलाय. रोहितला आठ सामन्यात फक्त 153 धावा काढता आल्या आहेत. रोहितला एकही अर्धशतक झळकावता आले नाही.  


ईशान किशन -  यंदाच्या आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ईशान किशनने याने सुरुवात दणक्यात केली. पण यामध्ये सातत्या राखता आले नाही. दोन सामने वगळता तो प्लॉप गेलाय. आठ सामन्यात त्याला 199 धावा काढता आल्या.  


विराट कोहली - आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीलाही यंदा आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. विराट कोहलीची बॅट शांतच आहे. विराट कोहलीने न सामन्यात फक्त 128 धावा केल्या आहेत. विराटला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. दोन वेळा विराट शून्यावर बाद झालाय. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा असणारा विराट यंदा खराब फॉर्ममध्ये आहे.  


मोईन अली - चेन्नईचा अष्टपैलू मोईन अली फ्लॉप राहिलाय. गोलंदाजी आणि फलंदाजीत निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे संघातून वगळण्यातही आलेय. पाच सामन्यात 87 धावा केल्यात. तर फक्त एक विकेट घेता आली. 


कायरन पोलार्ड- मुंबईचा अष्टपैलू पोलार्डसाठीही यंदाचा हंगामा खराब गेलाय. आठ सामन्यात पोलार्डला फक्त 115 धावा काढता आल्यात. तर फक्त तीन विकेट घेतल्या.


रवींद्र जाडेजा- चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार रवींद्र जाडेजाचा हा हंगाम खराब राहिलाय. आठ सामन्यात त्याला फक्त 112 धावा काढता आल्यात तर फक्त पाच विकेट घेतल्यात. 


रोवमन पॉवेल - विडिंजच्या पॉवेललाही मोठी खेळी करण्यात अपयश आलेय. दिल्लीकडून खेळताना पॉपलने सात सामन्यात फक्त 67 धावा केल्या आहेत. 


रोमारियो शेफर्ड - सनराइजर्स हैदराबाद (SRH) संघाने रोमारियो शेफर्डला 7.75 कोटीमध्ये खरेदी केले होते. शेफर्डला आयपीएलमध्ये मोठी खेळी करण्यात अपयश आले. दोन सामन्यात त्याने फक्त 32 धावा केल्यात. तर याच दरम्यान दोन सामन्यात त्याने 75 धावा देत दोन विकेट घेतल्या. 


पॅट कमिंस- 
कमिन्सने 14 चेंडूत अर्धशतक झळकावले पण गोलंदाजीत फ्लॉप राहिलाय. आतापर्यंत त्याने  15.5 षटकात 12 च्या सरासरीने 190 धावा दिल्यात. 


शार्दुल ठाकुर - दिल्ली कॅपिटल्सने (DC) अष्टपैलू शार्दुल ठाकुरला  10.25 कोटीमध्ये खरेदी केले होते. पण त्याला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. सात सामन्यात फक्त चार विकेट घेता आल्यात.  


वरूण चक्रवर्ती -  वरूण चक्रवर्तीला आठ सामन्यात फक्त चार विकेट घेता आल्यात. आतापर्यंत वरुणने 28 षटकात 247 धावा खर्च केल्यात. 


याशिवाय, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल