IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला उद्यापासून (26 मार्च)  सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. तर, दुसरा सामन्यात मुंबईचा संघ (MI) दिल्ली कॅपिटल्सशी (DC) भिडणार आहे. परंतु, या सामन्यापूर्वी चेन्नई आणि मुंबईच्या संघाला मोठा झटका बसलाय. या दोन्ही संघातील स्टार खेळाडू सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. 


दुखापतीमुळं मुंबईचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादव सुरुवातीचा सामना खेळणार नसल्याची महिती समोर आलीय. याबाबत मुंबईच्या संघानं कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. तर, चेन्नईचा आक्रमक फलंदाज मोईन अलीला व्हिसासाठी अडचणी येत आहेत. यामुळं तो उशीरा संघात दाखल होण्याची शक्यता आहे. 


व्हिसा संबंधित अडचणींमुळं मोईन अली उशीरा संघात सामील होणार?
व्हिजा संबंधित अडचणींमुलं मोईन अली उशीरा संघात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याला इंडियन हाय कमिशनकडून परवानगी मिळण्यास खूप उशीर लागला होता. आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी चेन्नईच्या संघानं मोईन अलील संघात कायम ठेवलं होतं. "मोईन अलीनं 28 फेब्रुवारी रोजी व्हिसासाठी अर्ज केला होता. अर्ज करून 20 दिवस उलटून गेले आहेत. मोईन अलीला व्हिसाची परवानगी मिळाली की नाही? याबाबत कोणताही माहिती समोर आलेली नाही", असं चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले आहेत.


सुर्यकुमार यादव दुखापतग्रस्त
सुर्यकुमार यादव दुखापतग्रस्त आहे. तो सध्या नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. एनसीएनं त्याला अद्याप रजा मंजूर केली नाही. दुखापतीमुळं त्याला श्रीलंका विरुद्ध टी-20 आणि कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. तसेच आयपीएलमध्ये दिल्ली विरुद्ध पहिल्या सामन्यात सुर्यकुमारला खेळता येणार नाही. परंतु, राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या सामन्यात तो संघात पुनारागमन करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha