Ben Stokes, IPL 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) सुरू होण्यासाठी आता काही दिवस शिल्लक असून सर्व संघ तयारीला देखील लागले आहेत. संघातील विदेशी खेळाडूही आपापल्या फ्रँचायझीमध्ये सामील होत आहेत. दरम्यान, इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सही भारतात पोहोचल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत सामील झाला आहे. 2022 च्या मिनी लिलावात चेन्नईने 16.25 कोटींची किंमत देऊन स्टोक्सचा संघात समावेश केला होता. त्याने आयपीएलपूर्वी सराव सुरू केला आहे. चेन्नई सुपर किंग्सने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये स्टोक्स दमदार षटकार मारताना दिसत आहे.
चेन्नई सुपरकिंग्सजने (CSK) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून बेन स्टोक्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये स्टोक्स एकामागून एक षटकार मारत असल्याचं आपण पाहू शकतो. स्टोक्सने अतिशय सुंदर शैलीत फलंदाजी केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. स्टोक्सने खेचलेले सर्व फटके अगदी पाहण्याजोगे आहेत. त्याच्या दोन्ही शॉट्सवरून तो जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचं दिसून आलं. 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्टोक्सने आपल्या संघासाठी सामना जिंकणारी खेळी खेळली. आता या नेट प्रॅक्टीसमध्येही त्याने वेगवान गोलंदाजाला पहिला षटकार मारला. त्याचवेळी त्याने थ्रोडाऊन स्पेशालिस्टवर दुसरा षटकार मारला.
पाहा VIDEO-
स्टोक्सची आतापर्यंतची आयपीएल कारकीर्द
बेन स्टोक्स (Ben Stokes) पुन्हा एकदा आयपीएल 2023 मधील स्पर्धेचा भाग असेल. स्टोक्सने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 43 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 42 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 25.56 च्या सरासरीने आणि 134.5 च्या स्ट्राईक रेटने 920 धावा केल्या. यामध्ये त्याने 2 शतकं आणि 2 अर्धशतकं झळकावली आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 107 धावांची आहे. 37 डावात गोलंदाजी करताना त्याने 34.79 च्या सरासरीने 28 विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान त्यांची इकोनॉमी 8.56 इतकी आहे.
IPL 2023 चे काही नवीन नियम
- निर्धारित वेळेबाहेरील प्रत्येक षटकासाठी 30-यार्ड वर्तुळाबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षकांना परवानगी आहे.
- यष्टिरक्षक आणि क्षेत्ररक्षकाच्या चुकीच्या हालचालींमुळे डेड बॉल आणि 5 पेनल्टी रन्स मिळतील.
- नाणेफेक झाल्यानंतर संघांनी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करायची आहे.
- फ्रँचायझी 15-खेळाडूंच्या टीम शीटचे नाव देतील, ज्यामध्ये 4 पर्यायांपैकी एक इम्पॅक्ट खेळाडू असेल.
हे देखील वाचा-