Hardik and Pant Practice : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना भारताने गमावल्यानंतर आत दुसरा सामना कटकमध्ये खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यात विजयासाठी भारताचा संघ प्रयत्नांची नक्कीच शिकस्त करणार आहे. दरम्यान या महत्त्वाच्या सामन्याआधी भारताचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दोघेही कसून सराव करत आहेत. सामन्यापूर्वी मैदानावर उतरुन सराव शिबिरात चौकार आणि षटकारांची बरसात दोघेही करताना दिसत आहेत. बीसीसीआय़ने यासंबधी एक व्हिडीओही ट्वीटरवर पोस्ट केला असून यावर क्रिकेट चाहते मोठ्या प्रमाणात रिएक्ट होताना दिसत आहेत.


पहिल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत तब्बल 212 धावांचे तगडे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवलं. पण मिलर आणि डस्सेन यांच्या खेळीच्या जोरावर आफ्रिकेने हे आव्हान सहज पार करत विजय मिळवला. भारताकडून ईशानने सर्वाधिक 76 धावा केल्या. कर्णधार पंतने 16 चेंडूत 29 तर हार्दिकने 12 चेंडूत 31 धावांची बरसात केली. आता आजच्या सामन्यात दोघे कशी कामगिरी करतील याकडे भारतीयांचं लक्ष्य लागून आहे. 


पाहा VIDEO



कशी असू शकते भारताची अंतिम 11


ईशान किशन, ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, आवेश खान, अर्शदीप सिंह/उमरान मलिक, रवी बिश्नोई. 


हे देखील वाचा-