India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात सुरु असलेल्या 5 टी20 सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात एक अत्यंत अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. दोन्ही संघाकडून दमदार खेळीचे दर्शन झाले. त्यामुळेच दुसऱ्या सामन्यातही दोन्ही संघाच्या खेळाडूकडून एका चांगल्या खेळीचं दर्शन होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान याच सामन्यात भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) एक खास रेकॉर्ड स्वत:च्या नावे करु शकतो. केवळ दोन विकेट्स घेऊन तो आर आश्विनला (R Ashwin) मागे टाकून नंबर 1 होऊ शकतो.


तर भुवनेश्वरकडे विक्रम रचण्याची संधी असलेला हा रेकॉर्ड म्हणजे भारताकडून टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या टी20 सामन्यात आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स आश्विनच्या नावावर आहेत. त्याने 6 टी20 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत. तर भुवीने 7 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान सध्या आश्विन संघात नसल्याने भुवी या सामन्यात दोन विकेट घेताच आश्विनला मागे टाकू शकतो. त्यामुळे या संपूर्ण मालिकेत त्याच्याकडे ही संधी असून अधिक विकेट्स घेऊन रेकॉर्ड मजबूत बनवण्याची संधी भुवीकडे आहे.


कशी असू शकते भारताची अंतिम 11


ईशान किशन, ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, आवेश खान, अर्शदीप सिंह/उमरान मलिक, रवी बिश्नोई. 


भारत विरुद्ध दक्षिण Head to Head  


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 16 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सात सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. परंतु, भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच पारडं जड दिसलं. भारतात दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामने जिंकले आहेत. तर, फक्त एकच सामना गमावला आहे. याआधी 2019 मध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. परंतु, पावसामुळं या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शना करत सामना जिंकला. तर, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला.  आता देखील मालिकेतील पहिला सामना आफ्रिकेने जिंकत वर्चस्व घेतलं आहे.


हे देखील वाचा-