नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयकडून इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मोठा बदल करण्याच्या विचारात आहेत. सर्वसाधारणपणे आयपीएलचा हंगाम मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सुरु होतो. मात्र, 2027 मध्ये आयपीएलचा हंगाम लवकर सुरु केला जाऊ शकतो. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार पुढील वर्षी आयपीएल 2 आठवडे अगोदर सुरु होऊ शकते.  

Continues below advertisement

पीटीआयच्या वृत्तानुसार बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी आयपीएलचा 2027 चा हंगाम 10 मार्चपासून सुरु होऊ शकतो तर फायनल 15 मे रोजी होणार आहे. म्हणजेच आयपीएल दरवर्षीच्या तुलनेत 2 आठवडे अगोदर सुरु होऊ शकते.

देवजीत सैकिया म्हणाले की  या वर्षी आयपीएलची सुरुवात 28 मार्चला झाली आणि फायनल 31 मे रोजी झाली. मात्र, स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात आणि 15 मे नंतर मान्सूपूर्व पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे वाढलेली उष्णता देखील आहे. उष्णता खेळाडू आणि प्रेक्षक यांच्यासाठी देखील अनुकूल नसते, असं सैकिया म्हणाले. 

Continues below advertisement

आयपीएल दोन आठवडे अगोदर सुरु होणार 

देवजीत सैकिया यांनी म्हटलं  गव्हर्निंग काऊन्सिल आयपीएलला 2 आठवडे अगोदर शिफ्ट करण्याबाबत विचार करत आहे. बीसीसीआयचे जनरल मॅनेजर एबी कुरुविला यांनी माहिती दिली के ते अशा प्लॅनवर काम करत आहेत. आयपीएल 2027 चा हंगाम सुरु करण्यासाठी 10 मार्च आणि 15 मे रोजी फायनलचा सामना होईल. 

बीसीसीआयच्या सचिवांनी म्हटलं की त्यांना काही खेळाडू आणि प्रेक्षकांकडून तक्रार मिळाली आहे. खेळाडूंना इतक्या उन्हात खेळण्याची सवय नसते. त्यामुळं आयपीएलचा 2027 चा हंगाम 15 मेपूर्वी संपवण्यावर बीसीसीआय विचार करत आहे.  

आयपीएलमधील सामन्यांची संख्या वाढवण्यासंदर्भात काही बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सध्या आयपीएलचे सामे वाढवण्यासंदर्भात कोणताही प्लॅन नाही. सध्या आयपीएलमध्ये  74 सामने खेळले जातात. सैकिया म्हणाले की प्रामुख्यानं विदेशी खेळाडूंना द्वीपक्षीय मालिका खेळायच्या असतात. त्यामुळं आयपीएल सामन्यांची संख्या 74 वरुन वाढवून 94 करण्याचा कोणताही विचार नाही.