DC, IPL 2022 : ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी यंदा निराशाजनक राहिली आहे. गुरुवारी दिल्लीचा सामना कोलकात्याशी होणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर सामना रंगणार आहे. यंदा दिल्लीला सात सामन्यात चार पराभव स्विकारावे लागले आहेत. तीन सामने जिंकत सहा गुणांसह दिल्ली गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. दिल्लीचा सहायक प्रशिक्षक शेन वॉटसन याला दिल्ली प्लेऑफसाठी पात्र होईल, असा विश्वास आहे. त्याचं समीकरणही त्याने सांगितले आहे. 


दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी उर्वरित प्रत्येक सामन्यात 40 षटकं सर्वस्वी पणाला लावून खेळावं लागेल. प्रत्येक खेळाडूला सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल, असे वॉटसन याने सांगितले आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी प्रत्येक सामन्यात 40 षटकापर्यंत सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करावे लागेल. आम्ही हे करु शकतो, यावर विश्वास आहे. संघात प्रतिभावंत खेळाडूंचा भरणा आहे. उर्वरित सात सामन्यात सर्व संघाने प्रयत्न करावे लागतील. सर्व सामने जिंकण्यासाठी मैदानात उतरावे लागेल, असे वॉटसन म्हणाला. 


संघातील काही खेळाडूला कोरोनाची बाधा झाली होती. तरीही पंजाबचा पराभव करत दिल्लीच्या संघाने आपली ताकद दाखवली होती. याच कामगिरीची पुनरावर्ती करण्याची गरज आहे. दिल्लीच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पंजाबला 115 धावांवर रोखलं होतं. फलंदाजांनी 57 चेंडू राखून हे लक्ष पार केले होते. हीच कामगिरी दिल्लीला पुन्हा कारवी लागणार आहे, असे वॉटसन म्हणाला. 


ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीचा संघाची यंदा निराशाजनक कामगिरी झाली आहे. दिल्लीला सात सामन्यात चार पराभव स्वीकारावा लागलाय. सहा गुणांसह दिल्ली गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे.  गुरुवारी दिल्लीचा सामना कोलकात्याशी होणार आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी दोन्ही संघाला विजय गरजेचा आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरली. हा सामना रोमांचक होईल, यात शंकाच नाही. 


हे देखील वाचा-