Ambati Rayudu Retirement: आयपीएलच्या सोळाव्या मोसमाचा विजेता कोण? धोनीची चेन्नई सुपर किंग्स, की हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स या प्रश्नाचं उत्तर काही तासांत मिळणार आहे. पण त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नईचा विस्फोटक फलंदाज अंबाती रायडू याने निवृत्तीची घोषणा केली आहे. अंबाती रायडू याने ट्वीट करत निवृत्तीची घोषणा केली आहे.
मुंबई आणि चेन्नई या दोन संघाचा भाग होण्याची संधी मिळाली. 14 हंगाम 204 सामने, 11 प्लेऑफ, 8 फायनल आणि पाच आयपीएल चषके... आज सहावा चषक जिंकू अशी आशा आहे. आज रात्री होणारी सामना माझ्या आयपीएल करिअरचा अखेरचा सामना असेल. सर्वांचे आभार.. अशी इमोशनल पोस्ट रायडूने केली आहे.
अंबाती रायडूचे आयपीएल करिअर -
मागील 14 वर्षांपासून अंबाती रायडू आययीपएलमध्ये धावांचा पाऊस पाडतोय. 2010 पासू रायडूच्या आयपीएल करिअरला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 203 सामने खेळले आहेत. यामध्ये तो 33 वेळा नाबाद राहिलाय. अंबाती रायडू याने 128 च्या स्ट्राईक रेटने आणि 29 च्या सरासरीने 4329 धावा केल्या आहेत. रायडूने आतापर्यंत एक शतक आणि 22 अर्धशतके झळकावली आहेत. तर 171 षटकार आणि 358 चौकार ठोकले आहेत. त्याशिवाय 64 झेल आणि 2 स्टपिंगही त्याच्या नावावर आहेत. रायडूने याच्यासाठी 2018 चा हंगमात सर्वोत्कृष्ट होता. या हंगामात रायडूने 16 सामन्यात 602 धावांचा पाऊस पाडला होता.