IPL 2022 : आयपीएलच्या यंदाच्या 15 व्या हंगामात कृणाल पंड्या लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघात खेळत आहे. तर हार्दिक गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच हे दोघेही आयपीएलमध्ये दोन वेगवेगळ्या संघातून खेळताना दिसत आहेत. दोन्ही भावांना मुंबई इंडियन्स (MI) या संघाने करारबद्ध केल्याने दोघांनी मुंबईकडून आयपीएलच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. पण यंदा प्रथमच दोघेही वेगवेगळ्या संघात खेळत आहेत.
दरम्यान कृणालला जेव्हा मैदानावर हार्दिकला मिस करतोस का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने नाही असं उत्तर दिलं. त्याच हे उत्तर अगदी आश्चर्यचकीत करणारं असलं तरी त्याने यामागील कारण देखील सांगितलं आहे.
'हा माझ्यासाठी IPL चा पहिला सीजन आहे'
सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध लखनौने विजय मिळवल्यानंतर कृणाल पंड्याने बातचित करताना सांगितले की, 'जेव्हा तुम्ही संघाच्या विजयात भागिदार असता तेव्हा खरचं चांगलं वाटतं. मला माझा नवा संघ आवडत आहे. मुंबई इंडियन्ससाठी मी चांगली कामगिरी केली होती. तिथे माझ्या काही आठवणी आहेत. त्यामुळे या नव्या संघात खेळताना हा माझा पहिला सीजन असल्याप्रमाणेच आहे. मी हा उत्साह सामन्यात आणि सरावांदरम्यान कायम ठेवू इच्छित आहे.'
'नाही करत हार्दिकला मिस'
हार्दिकला मिस करतोस का? या प्रश्नावर बोलताना, हार्दिकची कमतरता मैदानावर भासत नाही असं कृणाल म्हटला असून आम्ही आतापर्यंत जसं क्रिकेट खेळले आहोत ते पाहून आनंद होतो. तो ज्या जागी आहे, त्याचा खेळ पाहून मला आनंद होतो. आम्ही दोघेही आणखी उत्तम कामगिरी कशी करु शकतो, याकडे लक्ष देतो आणि आम्ही आमच्या खेळात आणखी सुधार करु इच्छित आहोत. असं कृणालने म्हटलं आहे.'
हे देखील वाचा-