MI Vs LSG, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 26 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमने सामने येणार आहेत.  हा सामना आज दुपारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या हंगामात मुंबईच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. मुंबईच्या संघाला यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच सलग पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. तर, केएल राहुलच्या नेतृत्वात लखनौनं आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. या सामन्यावर नजर टाकल्यास लखनौचे पारडे जड असल्याचे दिसते. लखनऊला गेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.


कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते?
मुंबई आणि लखनौ यांच्यात होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतात. मुंबईला सातत्यानं पराभवाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं मुंबईचा संघात बदल होण्याची शक्यता आहे आणि नव्या खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.  मुंबईचा टायमल मिल्स आणि टीम डेव्हिड यापैकी एकाला संघात स्थान देऊ शकतं. त्याचबरोबर बेसिल थंपी आणि फॅबियन ऍलन यापैकी एकाला आज खेळण्याची संधी मिळू शकते. तसे मयंक मार्कंडेचाही विचार केला जाऊ शकतो.


कधी, कुठे आणि कसा पाहणार सामना
आज 16 एप्रिल रोजी होणारा हा मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 3 वाजता नाणेफेक होईल. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम हा सामना खेळवला जाणार आहे.मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


संभाव्य संघ-


लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, 5 आयुष बदोनी, जेसन होल्डर, कृणाल पांड्या, के गौतम, दुष्मंथा चमिरा, आवेश खान, रवी बिश्नोई.


मुंबई इंडियन्स: इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, टायमल मिल्स/टिम डेव्हिड, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडे/एम अश्विन, जसप्रीत बुमराह, बेसिल थम्पी/फॅबियन अॅलन.


हे देखील वाचा-