IPL 2022 finale: आमिर खानचा (Aamir Khan) बहुप्रतिक्षेत असलेला चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? याची चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. आमिर खाननं नेहमी आपल्या निर्णयानं सर्वांना आश्चर्यचकीत केलं आहे. याचदरम्यान, लाल सिंह चड्ढाच्या ट्रेलर प्रदर्शनाबाबतही आमिरनं असाच काही निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यासाठी आमीर खाननं आयपीएलचा फायनल सामना निवडला आहे. या सामन्यात आमिर खान सूत्र संचालन करताना दिसणार आहे.आमिरच्या प्रोडक्शन हाऊसनं एक व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. 


या व्हिडिओत आमिर खान लाल सिंह चड्ढाचा ट्रेलर 28 मे 2022 रोजी म्हणजेच आयपीएलच्या फायनल सामन्यादरम्यान प्रदर्शित करणार असल्याची घोषणा केली. या दिवशी आमिर खान स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्ने हॉट स्टारवर संध्याकाळी 6 वाजता आयपीएलच्या फायनल सामन्याला होस्ट करणार आहे. 




व्हिडिओ- 


 


आमिर खानची अनोखी रणनीती
लाल सिंह चड्ढाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यापूर्वी आमिरनं चित्रपटाबाबत वेगळंच वातावरण तयार केलंय. या चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी त्यानं अनोखी रणनीती वापरली.'लाल सिंह चड्ढा'चा ट्रेलर आयपीएलच्या फायनलमध्ये प्रदर्शित होणार आहे. आयपीएलच्या उत्साहात आणखी भर घालण्यासाठी आमिर खान भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील फायनल सामन्यात होस्ट करण्यासाठी सज्ज झाला आहे.


आमिर खानसोबत करीना कपूर मुख्य भूमिकेत
चित्रपटसृष्टीच्या इतिहासामधील हा पहिलाच मोठा ट्रेलर प्रदर्शित सोहळा असणार असल्याचं बोललं जातंय. क्रिकेट सामन्याच्या सेकंड हाफमध्ये ‘लाल सिंह चड्ढा’चा ट्रेलर स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर प्रदर्शित केला जाईल. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये आमिरबरोबर करीना कपूरसह मोना सिंह आणि चैतन्य अक्किनेनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


हे देखील वाचा-