IPL 2023, PBKS VS LSG : पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पंजाबसाठी दिलासादायक बाब म्हणजे, नियमीत कर्णधार शिखर धवन 100 टक्के फिट झाला असून तो मैदानावर परतला आहे. शिखर धवन नाणेफेकीसाठी मैदानात उतरल्यानंतर पंजाबच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला होता. शिखर धवन याने नाणेफेक जिंकून लखनौला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेय.  पंजाबने मॅट शॉर्ट याला बाहेर बसवलेय. तर सिंकदर रजा याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय. त्याशिवाय पंजाबकडून गुरनूर ब्रार याने पदार्पण केलेय. गुरनूर वेगवान गोलंदाजी करतो.  


आयपीएल गुणतालिकेत लखनौ सुपर जायंट्स संघ चौथ्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने 7 पैकी चार सामन्यात विजय मिळवला असून संघाकडे 8 गुण आणि 0.547 नेट रनरेट आहे. पंजाब किंग्स संघ सहाव्या सातव्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्स संघ 7 पैकी 4 सामन्यात विजयानंतर 8 गुण आणि -0.162 नेट रनरेटसह सहाव्या क्रमांकावर आहे.


दोन्ही संघाची प्लेईंग 11 पाहूयात.. कुणाला स्थान मिळाले... दोन्ही संघाचे नेमके 11 शिलेदार कोण? 


पंजाबचे 11 किंग्स कोणते ? 


अथर्व तायडे, शिखर धवन (कर्णधार), सिकंदर रजा, लियाम लिविंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चाहर, गुरनूर बरार, अर्शदीप सिंह


लखनौ सुपर जायंट्सची प्लेईंग 11 कोणती ?
 
केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, निकलोस पूरन (विकेटकीपर), दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पांड्या, आयुष बडोनी, यश ठाकुर, रवि बिश्नोई, आवेश खान, नवीन-उल-हक


LSG vs PBKS IPL 2023 : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते...
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये लखनौ (LSG) आणि पंजाब (PBKS) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 2 सामने खेळवण्यात आले आहेत. दोन्ही संघांची परिस्थिती सारखी आहे. चेन्नई संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. असून राजस्थान संघाने 12 सामन्यांत विजय मिळवला आहे. आजच्या धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई आणि संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात राजस्थान संघ आमने-सामने येणार आहेत.


PBKS vs LSG Match Preview : 'नवाब' विरुद्ध 'किंग्स'
लखनौ सुपर जायंट्स संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आणि पंजाब संघ सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघ आजचा सामना जिंकून गुणतालिकेत उडी घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. आयपीएल 2023 मध्ये दोन्ही संघांची परिस्थिती समान आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी सात सामने खेळले आहेत. लखनौने यंदाच्या हंगामात खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच पंजाब संघाने खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.