Mohammed Siraj On Jasprit Bumrah मँचेस्टर :भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथी कसोटी 23 जुलैपासून सुरु होणार आहे. ही कसोटी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर होणार आहे. या मॅचमध्ये जसप्रीत बुमराह खेळणार की नाही याबाबत मोहम्मद सिराजनं अपडेट दिली आहे. भारत सध्या या मालिकेत 1-2 असं पिछाडीवर आहे. टीम इंडिया जसप्रीत बुमराहबाबत वर्क लोड मॅनेजमेंटचं धोरण राबवत असलं तरी तो चौथी कसोटी खेळणं महत्त्वाचं आहे.
चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराह खेळणार?
तेंडुलकर-अँडरसन मालिकेच्या सुरुवातीलाच जसप्रीत बुमराह पाच पैकी तीन कसोटी सामने खेळेल असं सांगण्यात आलं होतं. जसप्रीत बुमराह वर्कलोड मॅनेज म्हणून दुसऱ्या कसोटीत खेळला नव्हता. जसप्रीत बुमराहला दुखापत होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला गेला होता. बुमराहनं पहिली आणि तिसरी कसोटी खेळली आहे. भारताला लीड्स आणि लॉर्डस कसोटीत निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. आता चौथ्या कसोटीत भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यामुळं मँचेस्टर कसोटीत तो खेळतो का याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.
चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराह खेळणार का याबाबत संशय निर्माण झाला होता. आता मोहम्मद सिराजनं जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीत खेळणार असल्याचं म्हटलं. पत्रकार परिषदेत सिराजनं म्हटलं की जस्सी भाई तो खेलेंगे, आमचं समीकरण बदलत राहतं. मात्र, आम्हाला चांगल्या भागात बॉल टाकणं गरजेचं आहे. प्लान सोपा आहे, चांगल्या भागात गोलंदाजी करावं.
आकाशदीपच्या दुखापतीबाबत अपडेट
अर्शदीप सिंग अगोदरच दुखापतग्रस्त होऊन चौथ्या कसोटीबाहेर गेला आहे. यानंतर बातमी समोर आली की आकाशदीप देखील दुखापतीच्या बाहेर गेला असून चौथी कसोटी खेळू शकणार नाही. मात्र, आकाशदीपबाबत मोहम्मद सिराजनं मोठी अपडेट दिली आहे. सिराजनं आकाश दीप खेळेल की नाही याबाबत अपडेट दिली नाही. मात्र, आकाशदीपला ग्रोइन इंजुरी आहे, त्यानं आज गोलंदाजी केली आहे, आता फिजिओनं पाहतील, असं सिराज म्हणाला.