IPL Media Rights: आयपीएलच्या प्रसारण हक्कांच्या लिलाव प्रक्रियेत पहिल्या दिवशी  व्हायकॉम 18, सोनी, स्टार इंडिया आणि झी समूह यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. दुसऱ्या दिवशीही स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. ज्यामुळं बीसीसीआयला अपेक्षेप्रमाणे कमाई होताना दिसत आहे. महत्वाचं म्हणजे, पहिल्या दिवशीच्या लिलाव प्रक्रियेनंतर बीसीसीआय आता आयपीएल प्रसारण हक्कांच्या लिलावातून एका सामन्यात 104 कोटी रुपये कमावणार असल्याचं निश्चित झालंय. आयपीएलच्या प्रसारण हक्कांच्या लिलाव आज दुसरा दिवस आहे. ज्यामध्ये माध्यम अधिकारांची किंमत 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहचण्याशी शक्यता आहे. कोणत्याही खेळातील जागतिक अधिकारांच्या दृष्टीने ही सर्वात मोठी रक्कम असू शकते.


आयपीएलच्या प्रसारण हक्कांच्या शर्यतीत सात कंपन्या होत्या. त्यापैकी चार व्हिकॉम18, डिज्नी स्टार, सोनी आणि झी यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. सात तासानंतरही लिलाव प्रक्रियेचा निर्णय लागला नाही. आतापर्यंत या लिलावात 42 हजार कोटींपर्यंत बोली लावली गेली आहे. त्यानुसार, प्रति सामना 104 कोटी रुपये मोजण्याची तयारी स्पर्धकांनी दर्शवली आहे. लिलाव प्रक्रिया अजूनही सुरुच आहे. सोमवार किंवा मंगळवार उशिरापर्यंत अंतिम निर्णय येऊ शकत नाही. कारण पॅकेज 'ए' आणि 'बी' च्या बोली सोमवारी देखील सुरू राहतील.


महत्वाचं म्हणजे, प्रसारण हक्काचे वर्गीकरण चार गटांमध्ये करण्यात आले आहेत. हे सामने प्रसारित करण्याची माध्यमं वेगवेगळी असतील. 
पॅकेज ए: भारतीय उपखंड (टिव्ही)- 49 कोटी (प्रत्येक सामन्यासाठी)
पॅकेज बी: भारतीय उपखंड (डिजिटल)-  33 कोटी (प्रत्येक सामन्यासाठी)
पॅकेज सी: प्रत्येक सत्रात 18 निवडक सामन्यांच्या डिजिटल प्रसारणाचे अधिकार, 11 कोटी (प्रत्येक सामन्यासाठी)
पॅकेज डी: भाततीय उपखंडाबाहेरील देशांमध्ये टीव्ही आणि डिजिटल दोन्ही प्रसारणाचे अधिकार (33 कोटी)


बीसीसीआयला श्रेणी 'ए' आणि श्रेणी 'बी' कडून सर्वाधिक अपेक्षा आहेत. BCCI ला अपेक्षा आहे की श्रेणी 'ए' आणि 'बी' मधील IPL हक्कांचा लिलाव 50,000 कोटी रुपयांच्या पुढे जाऊ शकतो.


हे देखील वाचा-