Ramdas Athawale on CM Uddhav Thackeray : राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपचा विजय झाल्यानंतर महाविकास आघाडीवर विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवामुळं आघाडी सरकारची मोठी नामुष्की झाली आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार राहिला नसल्यानं त्यांनी राजीनामा देऊन सत्ता सोडायला पाहिजे, असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हणाले रामदास आठवले?
राज्यसभेत झालेल्या पराभवामुळं महाविकास आघाडी सरकारची मोठी नामुष्की झाली आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार राहिला नाही. त्यांनी राजीनामा देऊन सत्ता सोडायला पाहिजे. राज्यसभेत ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला तसाच पराभव 2024 च्या निवडणुकीत देखील होणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि आम्ही एकत्रित निवडणुक लढवून विजय मिळवणार असल्याचंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथे एका कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर आठवले हे सांत्वनपर भेटीसाठी जळगाव जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपनं विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी या जागेवर विजय मिळवत शिवसेनेच्या संजय पवारांचा (Sanjay Pawar) पराभव केला आहे. राज्यसभेच्या सहा जागांपैकी महाविकास आघाडीचे दोन तसेच भाजपचेही तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे.या सहाव्या जागेवर अत्यंत चुरशीची लढत झाली. यामध्ये महाडिकांनी बाजी मारली.
राज्यसभेचे विजयी उमेदवार
1. प्रफुल्ल पटेल- राष्ट्रवादी काँग्रेस- 43
2. इम्रान प्रतापगढी- काँग्रेस- 44
3. पियुष गोयल-भाजप- 48
4. अनिल बोंडे- भाजप- 48
5. संजय राऊत- शिवसेना- 41
6. धनंजय महाडिक- भाजप - 41
महत्वाच्या बातम्या:
- Sambhajiraje Chhatrapati : आव आणणाऱ्याची लगेचच फजिती, राज्यसभेच्या निकालानंतर संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला
- Mahadevrao Mahadik : "शोले'मधला रुपया माझ्याकडे आहे, कसाही उडवा, महाडिकच जिंकणार", अप्पा महाडिक, नाम तो सुना होगा!