IPL Live, RR vs CSK: राजस्थानचं चेन्नईसमोर धावांचं 217 आव्हान

राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार स्टीव स्मिथही पहिला सामना खेळू शकणार नाही, असं म्हटलं जात होतं. परंतु, स्टिव्ह स्मिथ खेळण्यासाठी फिट असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे स्मिथच्या वापसीमुळे संघाला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Sep 2020 09:23 PM
राजस्थानचा डाव गडगडला, स्कोर 4 बाद 150 धावा
एन्गिडीच्या गोलंदाजीवर संजू सॅमसन बाद, सॅमसनच्या एक चौकार आणि 9 षटकारांचा मदतीने 32 चेंडूत 74 धावा
संजू सॅमसंगची तुफानी खेळी, 19 चेंडूत झळकावलं अर्धशतक
चेन्नई संघात अंबाती रायुडू ऐवजी ऋतूराज गायकवाडला संधी
राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का, यशस्वी जैस्वाल माघारी
चेन्नई सुपर किंग्सचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय, आज राजस्थान रॉयल्सचा यंदाच्या मोसमातला पहिलाच सामना
राजस्थान रॉयल्सची प्लेईंग इलेव्हन

पार्श्वभूमी

IPL 2020, RR vs CSK :  इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनचा चौथा सामना आज (मंगळवार) चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये रंगणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाला आयपीएलमधील पहिल्या सामन्याआधीच अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. संघातील स्टार खेळाडू जॉस बटलर पहिला सामना खेळू शकणार नाही. तसेच ऑलराउंडर बेन स्टोक्सही आयपीएलच्या 13व्या सीझनच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. तसेच राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार स्टीव स्मिथही पहिला सामना खेळू शकणार नाही, असं म्हटलं जात होतं. परंतु, स्टिव्ह स्मिथ खेळण्यासाठी फिट असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे स्मिथच्या वापसीमुळे संघाला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.


 


राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव स्मिथला इंग्लंडच्या दौऱ्यावर मॅनचेस्टरमध्ये नेट प्रॅक्टिस करताना दुखापत झाली होती. त्यामुळे स्मिथ चीन वनडे मॅचमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. तसेच याच कारणामुळे स्मिथ आयपीएलमध्ये होणाऱ्या राजस्थानच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, असं सांगण्यात येत होतं. परंतु, आता स्मिथ आजच्या सामन्यात मैदानावर उतरणार असल्यामुळे राजस्थान रॉयल्सला मोठा दिलासा मिळाला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.