मुंबई: आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत क्रिकेटर मोहम्मद शमीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबईत आज ही बैठक होणार आहे.


आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

मोहमद शमीची पत्नी हसीन जहाँनं शमीवर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी तीनं सोशल मीडियावरुन शमीचे अनैतिक संबंध असल्याच्या पोस्टही टाकल्या होत्या. गुन्हा दाखल केल्याची तक्रार त्यांनी बीसीसीआयच्या टीमकडेही सुपूर्द केलीय.

पहिलं लग्न ते चीअर लीडर, शमीची पत्नी हसीनची कहाणी

त्याचदरम्यान आज आयपीएलच्या गव्हर्निंग काऊसिलची बैठक होत आहे. त्यामुळे यात शमीवर चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं आहे. मोहम्मद शमी सध्या दिल्ली डेअरडेव्हिल्स टीमकडून खेळतोय. मात्र त्यावर कारवाई झाली तर मात्र त्याला आयपीएल मुकावं लागू शकतं.

दरम्यान, आजच्या बैठकीला कार्यवाहक अध्यक्ष सी के खन्ना, सचिव अमिताभ चौधरी, कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी, सीईओ राहुल जोहरी असे दिग्गज उपस्थित असतील.

पत्नीच्या सर्व आरोपांवर मोहम्मद शमीचं उत्तर, EXCLUSIVE मुलाखत

दरम्यान, मोहम्मद शमीचं प्रकरण बीसीसीआयने भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे सोपवलं आहे. बीसीसीआयची भ्रष्टाचारविरोधी पथक 21 मार्चला शमीचा अहवाल बीसीसीआयकडे सोपवणार आहे.  या अहवालानंतर बीसीसीआय शमीबाबत निर्णय घेईल.

संबंधित बातम्या

मोहम्मद शमी चांगला माणूस, महेंद्रसिंग धोनी पाठीशी

दक्षिण आफ्रिकेतील महिलेसोबतही शमीचं अफेअर : हसीन जहां 

कोट्यवधींच्या 'हसीन फार्म हाऊस'चा वाद शमीला नडला? 

पहिलं लग्न ते चीअर लीडर, शमीची पत्नी हसीनची कहाणी 

पत्नीच्या सर्व आरोपांवर मोहम्मद शमीचं उत्तर, EXCLUSIVE मुलाखत