दिल्लीच्या फलंदाजीवेळी 20व्या ओव्हरमध्ये पाचव्या चेंडूवर स्टोक्सनं सीमारेषेजवळ एक भन्नाट कॅच पकडून सगळ्यांना चकीत केलं. शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाज मोहम्मद शमीनं उनाडकटच्या गोलंदाजीवर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. शमीनं मारलेला फटका पाहून असं वाटलं की चेंडू सीमारेषेपलीकडे जाईल. पण सीमारेषेवर असणाऱ्या स्टोक्सनं अप्रतिम फिल्डिंग करत फक्त 6 धावाच वाचवल्या नाही तर त्यानं एक विकेटही मिळवून दिली.
हा कॅच पाहून मैदानावरील प्रेक्षक अक्षरश: थक्क झाले.
याशिवाय स्टोक्सनं गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. त्यानं 4 ओव्हरमध्ये फक्त 31 धावा देऊन दोन गडी टिपले. तर फलंदाजी करताना त्याने 25 चेंडूत 33 धावा केल्या. यामध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.