वॉशिंग्टन : भारतात यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहणार नाही, अशी शक्यता अमेरिकन हवामान संस्थांनी वर्तवली आहे. यूएस क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर (CRC) आणि इतर संस्थांनी ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात अल निनोचं प्रमाण न्यूट्रल राहिल, असं म्हटलं आहे.

सुरुवातीला अल निनोचा प्रभाव राहणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण आता अल निनोचा मान्सूनवर प्रभाव होणार नसल्यानं राज्यासह देशभरात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज विविध हवामान संस्थांनी व्यक्त केला आहे.

अल निनोमुळे जगाच्या बहुतांश भागात/ भारतात कमी पाऊस/दुष्काळ/अवर्षणाची स्थिती होते. तर अल निनोमुळे भारतात सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्यास मदत होते. ऑस्ट्रेलियासारख्या काही देशात महापुराच्या घटनाही घडतात.

अल निनोचा प्रभाव कमी होऊन तो न्यूट्रल राहिला, तरी आपल्याकडे सरासरी पाऊसमान होण्याच्या आशा वाढतात.

संबंधित बातम्या :

अल निनोचा यंदा ‘मान्सून’वर फारसा परिणाम नाही: हवामान विभाग


मान्सूनवर अल निनोचा प्रभाव होणार नाही: हवामान खातं