IPL 2021 Auction : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकचा मुलगा अर्जुन तेंडूलकर आगामी 2021 च्या आयपीएल लिलावात सहभागी होणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनसाठी लिलाव करण्यात येणार आहे. अर्जुनबरोबर टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत देखील या लिलावात सहभागी होणार आहे.


वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडूलकरची बेस प्राईझ 20 लाख रूपये आहे. बीसीसीआयच्या सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी ट्वेन्टी स्पर्धेत अर्जुन सहभागी झाली होता. श्रीसंतने काही दिवसांपूर्वी सैय्यद मुश्ताक अली टुर्नामेंटमध्ये केरळच्या संघातून खेळताना दिसून आला होता. श्रीसंतची बेस प्राईज 75 लाख रूपये आहे.


आगामी आयपीएल 2021च्या लिलावासाठी एकूण 1097 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. या पैकी 814 खेळाडू भारतीय आणि 283 परदेशी खेळाडू आहेत. यामध्ये सर्वात जास्त वेस्टइंडीज (56) खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे (42), दक्षिण आफ्रिका (38), श्रीलंका (31), न्यूझीलंड (29), इंग्लंड (21), यूएई (9), नेपाळ (8), स्कॉटलंड (7), बांग्लादेश (5), आयर्लंड, झिम्ब्बावे, यूएसए आणि नेदरलँड येथील प्रत्येकी दोन खेळाडू लिलावात सहभागी झाले आहेत.




वेगवेगळ्या संघातून मुक्त झालेल्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (राजस्थान रॉयल्स) आणि ग्लेन मॅक्सवेल (किंग्ज इलेव्हन पंजाब) सारख्या दिग्गजांचा समावेश आहे.



IPL 2021 Auction: चेन्नईमध्ये होणार आयपीएलमधील खेळाडूंचा लिलाव, दिग्गज खेळाडूंवर लागणार बोली


यावेळी आयपीएल 2021 चा लिलाव खूप रंजक ठरू शकतो. कारण लिलावापूर्वी जवळपास सर्वच संघांनी मोठ्या खेळाडूंना रिलीज केलं आहे. अशा परिस्थितीत आता कोणता संघ कोणत्या खेळाडूवर बोली लावतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.