IPL 2021, SRH vs RR : सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात आज आयपीएल 2021 चा 40 वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सनराइजर्स हैदराबाद (SRH) ने राजस्थान रॉयल्स (RR) वर 7 विकेटने मात केली आहे. हैदराबादचा या हंगामातील हा दुसरा विजय आहे.   विल्यमसनच्या अर्धशतकाने विजय मिळवून दिला.



हैदराबादकडून जेसन रॉयने सर्वाधिक  60 धावा केल्या. या व्यतिरिक्त कर्णधार केन विल्यमसनने शानदार फलंदाजी करत नाबाद  51 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करत  20 षटकात 5 गडी गमवत 164 धावा केल्या आहेत. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने शान फलंदाजी करत 57 बॉलमध्ये 82 धावा केल्या परंतु पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. हैदराबादने या मॅचसाठी टीममध्ये अनेक बदल केले होते.



कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानी सुरूवातच खराब झाली. एविन लुईस 6 धावा करत तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने  यशस्वी जायसवालसह चांगली भागिदारी केली.  यशस्वी जायसवालने 36 धावा केल्या. त्यानंतर मैदानात आलेला लियाम लिविंगस्टोनला फक्त 4 धावा करता आल्या. हिपाल लोमरोरने नाबाद 29 धावा केल्या. रियान पराग शून्यावरच बाद झाला. राजस्थानने 20 षटकात 5 गडी गमावत  164 धावा केल्या.


राजस्थान रॉयल्स संभाव्य संघ : एविन लुईस, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, रियान पराग, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, राहुल तेवातिया, कार्तिक त्यागी, मुस्तफिझूर रहमान आणि चेतन साकारिया.


सनरायझर्स हैदराबाद संभाव्य संघ : केन विल्यमसन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर/जेसन रॉय, मनीष पांडे, रिद्धीमान साहा (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, जेसन होल्डर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, रशीद खान, संदीप शर्मा आणि खलील अहमद.