विरार : विरारमध्ये घरगुती वादातून पतीने पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. धारदार हत्याराने वार करून ही हत्या केली आहे. विरार पूर्व फुलपाडा गांधी चौकातील नरेंद्र माऊली अपार्टमेंट मध्ये ही घटना घडली आहे. सुप्रिया गुरव (वय 28) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव असून, जगदीश गुरव असे आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी पती हा फरार झाला आहे. 



विरार पुन्हा एकदा हादरलं आहे. विरारचे बांधकाम व्यावसायिक निशांत कदम याच्या हत्येनंतर आता विरारमध्ये पतीनेच पत्नीची रहात्या घरात हत्या करुन फरार झाला आहे. या घटनेनंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.


28 वर्षीय सुप्रिया गुरव यांची त्यांच्या रहात्या घरात पती जगदीश गुरव याने धारदार हत्यारांन वार करुन, निर्घृणपाने त्यांची हत्या केली आहे. विरार पूर्व फुलपाडा परिसरातील नरेंद्र माऊली अपार्टमेंट पहिल्या मजल्यावरील रूम नंबर 106 मध्ये हे कुंटुब रहात होतं.  काल मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरातच ही घटना घडली आहे. हत्या झालेल्या महिलेला तीन मुलं असून, ती आईकडे राहण्यासाठी गेली होती.  घरगुती वादातून हत्या केली असल्याची, प्राथमिक माहिती समोर येत आहे. विरार पोलीस ठाण्यात 302 प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी पतीच्या शोधासाठी दोन पोलीस पथक तयार करण्यात आली असून, आरोपी पतीचा शोध सुरु आहे.  


सांगलीत बंटी-बबलीने सहा जणांना 53 लाखांचा घातला गंडा! स्वस्तात सोने देण्याचं आमिष


 विरार पूर्व फुलपाडा परिसरात हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. बांधकाम व्यावसायिक निशांत कदम याच्या हत्येनंतर आता पतीने पत्नीची हत्या केल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी स्थनिक नागरीक करत आहेत.