RCB vs RR, Innings Highlights :

   राजस्थान विरुद्ध विराट कोहलीच्या बंगळुरुने शानदार विजय मिळवत आयपीएलमधील सलग चौथा विजय साजरा केला आहे.  या सामन्यात विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या सलामीच्या जोडीनं राजस्थानच्या गोलंदाजांची पिसं काढली. राजस्थाननं विजयासाठी दिलेलं 178 धावांचं लक्ष्य दोघांनीच पार केलं. देवदत्तनं 52 चेंडूत नाबात 101 धावा केल्या. तर विराटने 47 चेंडूत नाबाद 72  धावा केल्या. या मोठ्या विजयासह आयपीएल गुणतालिकेत बंगळुरुचा संघ पहिल्या नंबरवर पोहोचला आहे.  


त्याआधीमुंबईत सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात  राजस्थाननं बंगळुरुसमोर विजयासाठी 178 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. बंगळुरुने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. राजस्थानने सुरुवातीला चार विकेट झटपट गमावल्या. सुरुवातीला जोस बटलर, मनन वोहरा, डेविड मिलर आणि संजू सॅमसन स्वस्तात बाद झाल्यानं राजस्थानचा डाव गडगडला. मात्र शिवम दुबे आणि रियाननं राजस्थानचा डाव सावरला.  चुकीचा फटका मारण्याच्या नादात रियान पराग 25 धावा करुन बाद झाला. तर शिवम दुबे केन रिचर्डसनच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या ग्लेन मॅक्सवेलच्या हाती झेल देऊन बाद झाला. शिवमने 32 चेंडूत 46 धावांची खेळी केली.त्यानंतर राहुल तेवतियाने 23 चेंडूत 40 धावांची खेळी केली.  मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी करत 4 षटकात 27 धावा देत 3 तर हर्षल पटेलने 4 षटकात 47 धावा देत 3 गडी बाद केले.